करिश्मा कपूरसोबत अफेअर,महिला मुख्यमंत्र्यांना डेट करण्याची इच्छा,मात्र 49व्या वर्षीही अविवाहित; बॉलिवूड अभिनेत्याची लव्हलाइफ चर्चेत
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये एन्ट्री केलेल्या अभिनेत्याच्या नावावर कित्येक चित्रपट असतानाही त्यातील काहीच चित्रपट चालले तर बाकीचे फ्लॉप गेले. या अभिनेत्याच्या करिअरची चर्चा जेवढी झाली तेवढीच त्याच्या लव्हलाइफचीही चर्चा झाली. त्याच्या आयुष्यात अनेक सुंदर मुली आल्या मात्र त्याने लग्न केलं नाही. आज वयाच्या 49 व्या वर्षीही तो अविवाहितच आहे.

बॉलिवूडमध्ये बरेच असे अभिनेते आहेत ज्यांचे घराणेच पूर्वीपासून बॉलिवूडवर राज्य करतायत. जसं की खान कुटंब, कपूर घराणं, असेच आणखीही बरेच स्टार असतील ज्यांच्या घरात पिढ्यां पिढ्या अॅक्टींग हेच क्षेत्र निवडण्यात आलं. पण यातील सर्वच यशस्वी झाले असे नाही. काहींनी तो वारसा सुरु ठेवला आणि बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. तर, काहीजण फार यशस्वी होताना दिसले नाही.
अभिनेत्याच्या करिअरपेक्षाही लव्हलाइफची चर्चा
असाच एक अभिनेता आहे ज्याने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या अभिनेत्याचे वडील 70-80 च्या दशकातील मोठे सुपरस्टार होते. मात्र या अभिनेत्याच्या कित्येक चित्रपट नावावर असतानाही त्यातील काहीच चित्रपट चालले तर बाकीचे फ्लॉप गेले. बरं या अभिनेत्याच्या करिअरची चर्चा जेवढी झाली तेवढीच त्याच्या लव्हलाइफचीही चर्चा झाली.
सुपरस्टार होऊ शकला नाही
हा अभिनेता म्हणजे विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्ना. अक्षय खन्नाने अनेक चित्रपट केले. त्याचा अभिनयही लोकांच्या पसंतीस उतरला.अक्षयने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. त्याने अनेक हिट चित्रपटही दिले. मात्र तो वडिलांप्रमाणे तो सुपरस्टार होऊ शकला नाही. शिक्षणामध्ये रस नसल्यामुळे अक्षय खन्नाने चित्रपटातच करिअर करायचे ठरले.
View this post on Instagram
करिश्मा कपूरसोबत अफेअरच्या चर्चा
अक्षयचा करिअर ग्राफ जसा वर गेला नाही तसा त्याच्या लव्हलाइफचा ग्राफही हवा तसा यशस्वी झाला नाही. तो वयाच्या 49 व्या वर्षी देखील अविवाहितच आहे. अक्षय खन्नाचे नाव अनेक सुंदर अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे.
अभिनेत्याचे वैयक्तिक आयुष्यही खूप मनोरंजक होते. असं म्हटलं जातं की त्याचे करिश्मा कपूर आणि तारा शर्मासोबत अफेअर होते. पण त्याने लग्न कधीच केलं नाही.त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्याने करिश्मासोबत लग्न करावं. पण करिश्माची आई बबिता यांना हे लग्न मान्य नव्हतं.
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री जयललिता यांना डेट करायचे होते
एवढच नाही तर अक्षयला एका महिला मुख्यमंत्र्यांना डेट करण्याची इच्छा होती. एका मुलाखतीत अक्षयने सांगितले होते की, त्याला तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री जयललिता यांना डेट करायचे होते. मात्र सध्यातरी तो सिंगलच आयुष्य जगत आहे. दरम्यान अक्षय खन्ना लवकरच ‘छावा’ चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमधील त्याच्या लूक आणि अभिनयाची चर्चा होताना दिसते.
