AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणबीर कपूर खरंच टॉक्सिक पार्टनर? अखेर आलियाने सोडलं मौन

अभिनेत्री आलिया भट्टने एका जुन्या व्हिडीओमध्ये तिच्या मेकअप रुटीनबद्दल सांगितलं होतं. त्यात तिने असं म्हटलं होतं की ती ओठांना लिपस्टिक लावून नंतर पुसून टाकते. कारण तिचा पती रणबीर कपूरला लिपस्टिकचा गडद रंग आवडत नाही. यावरून नेटकऱ्यांनी रणबीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती.

रणबीर कपूर खरंच टॉक्सिक पार्टनर? अखेर आलियाने सोडलं मौन
रणबीर कपूर, आलिया भट्टImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 16, 2023 | 3:03 PM
Share

मुंबई : 16 नोव्हेंबर 2023 | ‘कॉफी विथ करण 8’च्या नव्या एपिसोडमध्ये अभिनेत्री करीना कपूर आणि आलिया भट्ट यांनी पाहुणे म्हणून हजेरी लावली. या शोमध्ये दोघींनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल करण जोहरसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी आलिया तिचा पती रणबीर कपूरविषयी होणाऱ्या ट्रोलिंगविषयीही व्यक्त झाली. एका जुन्या व्हिडीओमुळे आलियाने रणबीरच्या एका सवयीबद्दल सांगितलं होतं. रणबीरला भडक रंगाची लिपस्टिक आवडत नाही, म्हणून मी ती पुसून टाकते, असं आलियाने त्यात म्हटलं होतं. त्यानंतर नेटकऱ्यांनी रणबीरला ‘टॉक्सिक’ (विषारी स्वभावाचा) म्हणत त्याला खूप ट्रोल केलं होतं. या ट्रोलिंगवर आता आलियाने मौन सोडलं आहे.

“मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी विनाकारण वाढवल्या जात आहेत. फक्त एका व्हिडीओमुळे इतकी ट्रोलिंग झाली. मी ते सर्व पाहिलं आणि माझ्या टीमला म्हटलं की हे प्रमाणापेक्षा जास्त वाढत जातंय. पण मी त्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं होतं. कारण लोक नेहमी काही ना काही म्हणतच असतात. नंतर मी असे अनेक आर्टिकल्स वाचले, ज्यामध्ये लोकांनी रणबीरला दोषी ठरवलं होतं. जगात इतके सारे मुद्दे आहेत, ज्यावर चर्चा होऊ शकते. पण या क्षुल्लक गोष्टीला इतकं वाढवण्याची गरजच नव्हती”, असं आलिया म्हणाली. “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आणि त्यावरून रणबीरला ट्रोल केलं गेलं. मला एका गोष्टीचं वाईट वाटलं की जसं लोक रणबीरला समजतात, तसा तो बिलकूल नाही. तो लोकांच्या या विचारांपेक्षा खूप वेगळा आहे”, असंही आलियाने स्पष्ट केलं.

नेमकं काय होतं प्रकरण?

आलियाने एका व्हिडीओमध्ये तिचा मेकअप रुटीन सांगितला होता. कोणत्याही कार्यक्रमासाठी, शूटसाठी किंवा डिनर डेटसाठी जाताना ती कसा मेकअप करते, हे तिने व्हिडीओमार्फत दाखवलं होतं. या व्हिडीओच्या अखेरीस ती तिच्या लिपस्टिक लावण्याच्या अनोख्या पद्धतीविषयी सांगते. सर्वसामान्य मुली लिपस्टिक कशा पद्धतीने लावतात आणि ती कशा पद्धतीने लावते, यातला फरक तिने सांगितला होता. यावेळी तिने हेसुद्धा सांगितलं की ती लिपस्टिक लावून ते पुसून टाकते. कारण रणबीरला तिने लिपस्टिक लावलेलं आवडत नाही. त्याला माझ्या ओठांचा नैसर्गिक रंगच आवडतो, असं आलियाने म्हटलं होतं. यावरूनच नेटकऱ्यांनी रणबीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती.

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.