‘तू प्रेग्नेंट दिसतेस…’ आलिया भट्टने दुसऱ्यांदा दिली गुड न्यूज? कान्समध्ये ब्लॅक गाऊनमध्ये दिसलं बेबी बंप? लूकवर चाहत्यांची कमेंट

पहिल्या दिवशी बेज रंगाचा ऑफ-शोल्डर मर्मेड गाऊन घालून कान्स रेड कार्पेटवर प्रवेश केला. दुसऱ्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, आलियाने नेव्ही ब्लू शिमरी बॉडीकॉन ड्रेस घातला होता. पण या ड्रेसमध्ये तिचं पोट दिसत असल्याने नेटकऱ्यांनी ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु केल्या आहेत.

तू प्रेग्नेंट दिसतेस... आलिया भट्टने दुसऱ्यांदा दिली गुड न्यूज? कान्समध्ये ब्लॅक गाऊनमध्ये दिसलं बेबी बंप? लूकवर चाहत्यांची कमेंट
aliya bhatt
Image Credit source: instagram
| Updated on: May 25, 2025 | 5:02 PM

कान्स फेस्टिव्हल 2025 ची सुरुवात 17 मे पासून झाली आहे. दरवर्षी बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी कान्स फेस्टिव्हलचा भाग बनले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट देखील सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर आपली जादू दाखवत आहे.

कान्समध्ये आलियाच्या प्रेग्नेंट होण्याबद्दल चर्चा 

आलियाने कान्स 2025 मध्ये सहभाग घेतला आहे. तिच्या लूकबद्दल सर्वजण खूप उत्सुक दिसत होते. आलियानेही तिने कान्सच्या रेड कार्पेटवर तिच्या लूकने सर्वांनाच प्रभावित केले.पण आलियाचा दुसरा लूक पाहून चाहते तिच्या प्रेग्नेंट असल्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे.

आलियाच्या सर्वच लूकची रेड कार्पेटवर जादू 

आलिया भट्टने पहिल्या दिवशी बेज रंगाचा ऑफ-शोल्डर मर्मेड गाऊन घालून कान्स रेड कार्पेटवर प्रवेश केला. दुसऱ्या लूकबद्दल बोलायचं झालं तर, आलियाने नेवी ब्लू शिमरी बॉडीकॉन ड्रेसघातला होता. तिच्या लूकने सर्वच चाहते नक्कीच घायाळ झाले होते. आलियाच्या तिच्या दोन्ही लूकमध्ये रेड कार्पेटवर सुंदर पोजही दिल्या होत्या. पण जेव्हा चाहत्यांना आलियाच्या एका लूकमध्ये एक वेगळीच गोष्ट लक्षात आली होती म्हणजे एका ड्रेसमध्ये दिसणारं तिचं पोट.


आलियाचा बेबी बंप दिसला…

खरंतर, आलिया भट्टचा दुसरा लूक म्हणजेच नेव्ही ब्लू शिमरी बॉडीकॉन ड्रेस पाहिल्यानंतर, सोशल मीडिया युजर आलिया प्रेग्नेंट असल्याबद्दल बोलत आहेत. या बॉडीकॉन ड्रेसमध्ये, नेटकऱ्यांनी आलियाचा बेबी बंप पाहिला आणि तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल प्रश्न विचारत आहेत.

नेटकऱ्यांनी दिल्या शुभेच्छा 

आलियाच्या या फोटोवर कमेंट करत अनेक युजर्सने तिला तिच्या प्रेग्नेंसीबद्दल प्रश्न विचारले आहेत. त्याच वेळी, असे अनेक युजर्सने थेट तिचे अभिनंदन केलं आहे. एका युजरने कमेंट करत प्रश्न विचारलं की, ‘ती प्रेग्नेंट आहे का?’ दुसऱ्याने लिहिले की, ‘ती पुन्हा प्रेग्नेंट आहे आहे असं वाटतंय’, तर एकाने लिहिले, ‘ती गर्भवती दिसतेय, फक्त मलाच असे वाटते का?’ तर बाकींच्यांनी तिचं थेट अभिनंद केलं आहे. आलियाने मात्र यावर अद्यापही कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही. आता आलिया नक्की यावर काय प्रतिक्रिया देतेय हे पाहणं महत्त्वांच आहे.