आलियाच्या मुलीला भेटायला येणाऱ्या पाहुण्यांसाठी ‘ही’ अट; फोटोसाठीही करावी लागणार प्रतीक्षा

| Updated on: Nov 13, 2022 | 2:20 PM

आलिया-रणबीरने मुलीचे फोटो काढण्याबाबत ठेवली 'ही' मोठी अट

आलियाच्या मुलीला भेटायला येणाऱ्या पाहुण्यांसाठी ही अट; फोटोसाठीही करावी लागणार प्रतीक्षा
Alia and Ranbir
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई- अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टने यावर्षी 14 एप्रिल रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या सात महिन्यांतच आलियाने मुलीला जन्म दिला. 6 नोव्हेंबर रोजी आलिया आणि रणबीरने आई-बाबा म्हणून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. चिमुकलीच्या जन्मानंतर कपूर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. आलियाच्या मुलीचा फोटो पाहण्यासाठी चाहतेसुद्धा प्रचंड उत्सुक आहेत. अशातच आलिया आणि रणबीरने त्यांच्या मुलीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या पावलांवर पाऊल ठेवत रणबीर-आलियानेही त्यांच्या बाळाचे फोटो क्लिक करण्याबद्दल नियमावली आखली आहे. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, चिमुकलीला भेटायला येणाऱ्या कोणत्याच पाहुण्यांना तिचा फोटो काढण्याची संमती नाही.

हे सुद्धा वाचा

रणबीर आलियाने त्यांच्या बाळासाठी ‘नो पिक्टर पॉलिसी’ अवलंबली आहे. म्हणजेच आई-बाबाच्या परवानगीशिवाय या बाळाचा फोटो कोणी काढू शकत नाही. त्यांनी जवळच्या मित्रमैत्रिणींनाही याबद्दलच्या सूचना दिल्या आहेत.

इतकंच नव्हे तर नवजात शिशूंना कोरोनाच्या लागणची अधिक शक्यता असल्याने कोविड-19 टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट असलेल्या पाहुण्यांनाच तिला भेटण्याची परवानगी दिली जाणार आहे. मुलगी वर्षभराची होईपर्यंत हे नियम काटेकोरपणे दोघंही पाळणार आहेत.

10 नोव्हेंबर रोजी आलियाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी चिमुकलीला कारमधून घरी घेऊन जातानाचे व्हिडीओ पापाराझींनी शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केले. मात्र त्यात रणबीरने तिचा चेहरा पूर्णपणे झाकला होता. त्यामुळे आलिया-रणबीरच्या मुलीचा फोटो पाहण्यासाठी चाहत्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.