AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alia Bhatt ची एक गोष्ट कायम ऐश्वर्या राय हिला खटकते! बच्चन कुटुंबाच्या सूनेचा मोठा खुलासा

बच्चन कुटुंबाच्या सूनेने साधला कपूर कुटुंबाच्या सूनेवर निशाणा... आलियाकडे असलेल्या 'या' गोष्टीचा तिरस्कार करते ऐश्वर्या राय बच्चन?

Alia Bhatt ची एक गोष्ट कायम ऐश्वर्या राय हिला खटकते! बच्चन कुटुंबाच्या सूनेचा मोठा खुलासा
| Updated on: Jun 02, 2023 | 2:59 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचं बच्चन आणि कपूर कुटुंब फार मोठं आहे. दोन कुटुंबाची प्रसिद्धी आणि लोकप्रियता देखील फार मोठी आहे. कपूर आणि बच्चन कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. पण आता सुनांनमुळे कपूर आणि बच्चन कुटुंब चर्चेत आलं आहे. बच्चन कुटुंबाची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने चक्क कपूर कुटुंबाची सून आणि अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यावर निशाणा साधला आहे. आलिया भट्ट हिला कायम घराणेशाही वरून ट्रोल केलं जातं. आता आलियावर इतरांनी नाही तर, ऐश्वर्या राय हिने दिग्दर्शक करण जोहर याचं नाव मध्ये घेवून अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे. सध्या सर्वत्र आलिया भट्ट आणि ऐश्वर्या राय यांची चर्चा सुरु आहे.

आलिया भट्ट हिच्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांची मुलगी आहे. आलिया हिला करण जोहर याने ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला. त्यानंतर आलियाने कधीही मागे वळून पाहिलं नाही. पहिल्या सिनेमानंतर आलिया हिला ‘हायवे’, ‘उडता पंजाब’, ‘राझी’, ‘गली बॉय’, ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

अनेक हीट सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकल्यामुळे आलियाला ‘नेपो किड’ म्हणून ट्रोल करण्यात आलं. अशात एका जुन्या मुलाखतीत, आलियाच्या करियरमध्ये करण जोहर याचा मोलाचा वाटा असल्याचं वक्तव्य ऐश्वर्या राय हिने केलं होतं. ऐश्वर्या म्हणाली, ‘आलिया हिला सहज चांगल्या ऑफर मिळतात. कलाकार म्हणून एक गोष्ट उत्तम आहे, ती म्हणजे जे तुम्हाला ओळखतात तेच तुम्हाला चांगल्या ऑफर्स देतात…’

पुढे ऐश्वर्या म्हणाली, ‘पण महत्त्वाचं म्हणजे आलिया सहज ऑफर्स मिळत आहेत आणि ती उत्तम काम करत आहे.’ जेव्हा ऐश्वर्याने आलियाबद्दल वक्तव्य केलं, तेव्हा अनेकांनी बच्चन कुटुंबाच्या सूनेला ट्रोल देखील केलं. शिवाय अभिषेक बच्चन हा महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा मुलगा असल्याची आठवण नेटकऱ्यांनी ऐश्वर्याला करून दिली.

ऐश्वर्या राय आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर अभिनेत्रीचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. ऐश्वर्या कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. शिवाय अभिनेत्रीला मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत देखील स्पॉट केलं जातं..

आलिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या आलियाने ‘गंगूबाई काठियावाडी’ पर्यंतचा टप्पा गाठला. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचं आणि कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते..

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?