AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alka yagnik Birthday Special: तिने 2 हजार गाणी गायली पण 27 वर्ष नवऱ्यापासून वेगळी राहिली, का? जाणून घ्या अलका याज्ञिक विषयी सर्व काही…

Alka yagnik Birthday Special : फक्त बॉलीवुडच नाही तर 16 भाषांमध्ये गाणं गायलेल्या सिंगर अलका याज्ञिक यांचा आज 55 वा वाढदिवस. बॉलिवुडचं यश पाहिलेली गायिका म्हणून अलकांची ओळख आहे.

Alka yagnik Birthday Special: तिने 2 हजार गाणी गायली पण 27 वर्ष नवऱ्यापासून वेगळी राहिली, का? जाणून घ्या अलका याज्ञिक विषयी सर्व काही...
Alka yagnik
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Mar 20, 2021 | 9:17 AM
Share

मुंबई : फक्त बॉलीवुडच नाही तर 16 भाषांमध्ये गाणं गायलेल्या सिंगर अलका याज्ञिक (Alka yagnik ) यांचा आज 55 वा वाढदिवस. बॉलिवुडचं यश पाहिलेली गायिका म्हणून अलकांची ओळख आहे. पण हेच यश मिळवण्यासाठी जीवन किती खडतरपणे जगावं लागलं तेही महत्वाचं आहे. (Alka yagnik married life facts know her husband)

अलका याज्ञिक यांचं तपश्चर्यने घडलेलं करिअर

अलका याज्ञिक यांनी वयाच्या 14 व्या वर्षी म्युझिक इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. प्यार की झंकार, ‘मेरे अंगने मे’ सारखे सुरुवातीला हिट गाणे दिले. आज घडीला जवळवास 2 हजार गाणी त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी फक्त हिंदीच नाही तर 16 वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायलीत. पण सुपरहिट असलेलं पहिलं गाणं होतं, तेजाबमधलं ‘एक दोन तीन…’. याच गाण्यावर माधुरी दिक्षितने काही पिढ्यांना भुरळ पाडली. अलका याज्ञिक यांनाही पहिलं फिल्मफेअर याच गाण्यासाठी मिळालं. पण या यशाच्या पाठीमागे काही खडतर निर्णय आहेत.

लग्न आणि दुरावा

अलका याज्ञिक ह्या कोलकात्याच्या. एका गुजराती कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरात संगिताचं वातावरण होतं. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्या भजन किर्तन गायच्या. नंतर बॉलिवुडमध्ये चांगलं बस्तान बसवलं. 1989 ला त्यांनी उद्योगपती नीरज कपूर यांच्याशी लग्न केलं. नीरज हे शिलॉंगचे. पण लग्न करुनही दोघांना एक नाही दोन नाही तर 27 वर्ष एकमेकांपासून दूर रहावं लागलं.

नवऱ्यापासून का रहावं लागलं 27 वर्ष दूर

सध्याचा काळ हा लाँग डिस्टन्सिंग रिलेशनशिपचा आहे. पण ज्या काळात अलका याज्ञिक नवऱ्यापासून एवढ्या मोठा काळ दूर राहिल्या तेव्हा अशा संबंधांचा फार बोलबाला नव्हता. अलका याज्ञिक यांचे पती नीरज कपूर हे शिलाँगला बिजनसमॅन होते. त्यांचा सगळा व्यवसाय तिथेच होता. अलका याज्ञिकांना मुंबईत रहावं लागायचं. कारण त्यांचं काम, गाणं सगळं मायानगरीत होतं. अलकासाठी मुंबईत येऊन नीरज कपूर यांनी व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आलं नाही. शेवटी अलका यांच्याच सांगण्यावरून ते परत शिलाँगला गेले आणि तिथंच व्यवसाय केला. अधूनमधून ते मुंबईत यायचे. अशा पद्धतीनं त्यांना 27 वर्ष एकमेकांसोबत लग्न होऊनही लाँग डिस्टन्स रिलेशिनशिपमध्ये रहावं लागलं. अलका याज्ञिक यांनी मुलांचा एकहाती सांभाळ केला.

(Alka yagnik Birthday Special Alka married life facts know her husband)

Follow Us
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?