अल्लू अर्जुनचा 18 वर्षांपासून भावाशी अबोला,आजही नाराजी; या बॉलिवूड अभिनेत्रीमुळे नात्यात दुरावा
दक्षिणेतील सुपरस्टार्स म्हटलं की अल्लू अर्जुन आणि त्याच्या भावामध्ये गेल्या 18 वर्षांपासून वाद सुरु आहे.आजही ते एकमेकांशी बोलत नाही. त्यांच्या न बोलण्यामागील कारण आहे एक अभिनेत्री. या बॉलिवूड अभिनेत्रीमुळे हे भाऊ आजही एकमेकांशी बोलत नाही.

दक्षिणेतील सुपरस्टार्स म्हटलं की अनेक नावं समोर येतात त्यातीलच एक म्हणजे अल्लू अर्जून. अल्लू अर्जूनची वेगळी ओळख करून देण्याची गरज आहे. त्याच्या स्टार्डमबद्दल सर्वांनाच माहित आहे. अल्लू अर्जूनचं घराणचं सुपरस्टार म्हणून ओळखलं जातं. कारण त्याच्या घरातील जवळपास सर्वच सुपरस्टार आहेत. पण अल्लू अर्जुन त्याच्या चित्रपटांसाठी, त्याच्या अभिनयासाठी नेहमीच चर्चेत असतो. पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत तेवढं कोणालाही माहित नाही.
राम चरण आणि अल्लू अर्जुन यांच्यातील नाते
त्यातीलच एक म्हणजे राम चरण आणि अल्लू अर्जुन यांच्या नात्याबद्दल. हे फार कमी जणांना माहित असेल की अल्लू अर्जून हा त्याचा भाऊ राम चरण याच्याशी गेल्या 18 वर्षांपासून बोलत नाही. होय राम चरण आणि अल्लू अर्जुन टॉलिवूडमधील टॉप हिरो असण्यासोबतच, ते दोघेही नातेवाईक आहेत. ते लहानपणापासून एकत्र वाढले आणि एकाच घरात खेळले. पण दोघांबद्दल असे म्हटले जाते की एकदा त्यांचे एका कारणावरून भांडण झाले. अशाही अफवा आहेत की दोघांमध्ये इतका वाद झाला की ते 18 वर्षे एकमेकांशी बोलले नाहीत. आणि याचं कारण होतं एक अभिनेत्री.
या अभिनेत्रीमुळे दोन भावांमध्ये पडली फूट
‘पुष्पा’चित्रपटातून संपूर्ण भारतात स्टार बनलेल्या अल्लू अर्जुनच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात, तो एका अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. ती अभिनेत्री होती नेहा शर्मा, जिने “चीअरलीडर” या चित्रपटातून सर्वांची मने जिंकली. “क्रूक” चित्रपटातून प्रसिद्ध झालेल्या नेहा शर्माने तेलुगू चित्रपटातून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यावेळी असे वृत्त होते की नेहा आणि अल्लू एकमेकांच्या खूप जवळ आले. अशाही अफवा होत्या की तिला त्याच्याशी लग्न करायचे होते.
अल्लू अर्जुनला आवडणाऱ्या अभिनेत्रीचे त्याच्या भावाशी अफेअरच्या चर्चा
त्यानंतर 2007 मध्ये नेहा शर्माने पहिल्यांदा राम चरणसोबत “चिरुथा” मध्ये मुख्य भूमिका साकारली. त्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, राम चरण आणि नेहा यांच्यात काहीतरी चालले आहे अशा अफवा पसरल्या. इंडस्ट्रीमध्ये अशी चर्चा पसरली की दोघांमधील जवळीक प्रेमात बदलली आहे. इतकेच नाही तर अफवा पसरवणाऱ्यांनी असेही म्हटले की दोघांनी गुपचूप लग्नही केले आहे.
View this post on Instagram
अल्लू अर्जुन खूप दुखावला
या सर्व अफवांमुळे अल्लू अर्जुन खूप दुखावला गेला. ज्या मुलीशी तो लग्न करण्याचे स्वप्न पाहत होता ती त्याच्या चुलत भावाच्या प्रेमात पडली आहे हे ऐकून त्याला खूप वाईट वाटले असे म्हटले जाते. असे म्हटले जाते की या एका घटनेमुळे राम चरण आणि अल्लू अर्जुनमधील अंतर वाढले. अशी अफवा पसरली होती की अल्लू अर्जुन आणि राम चरण यांनी चिरुथा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 18 वर्षे एकमेकांशी बोलले नव्हते.
भावामधील आणि अल्लू अर्जुनमधील अंतर अद्याप कमी झालेले नाही.
या सगळ्यात, राम चरणने 2012 मध्ये उपासनाशी लग्न केले आणि 2023 मध्ये त्यांना एक मुलगी झाली. दुसरीकडे, अल्लू अर्जुननेही स्नेहा रेड्डीशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. आजच्या काळात ते दोघेही खूप लोकप्रिय अभिनेते म्हटले जातात. असे म्हटले जाते की राम चरण आणि अल्लू अर्जुनमधील अंतर अद्याप कमी झालेले नाही. जर ते कोणत्याही कार्यक्रमात दिसले तर ते खूप दूर दिसतात.
पण सत्य हेच आहे की या अभिनेत्रीमुळेच दोन भावांमध्ये फूट
पण सत्य हेच आहे की अल्लू अर्जुन आणि राम चरण यांच्यातील दुराव्याचे कारण नेहा शर्मा आहे असे कोणतेही पुरावे नाहीत. तसेच, अलिकडच्या काळात दोघांमध्ये अंतर का ठेवले याची कारणे उघड झालेली नाहीत. पण या गोष्टी इंडस्ट्रीत नेहमीच चर्चेत असतात. नेहा शर्माबद्दल बोलायचे झाले तर, ती भागलपूरचे काँग्रेस आमदार अजय शर्मा यांची मुलगी आहे. तिची बहीण आयेशा शर्मा देखील तिच्यासोबत मुंबईत राहते. दोघीही हिंदी चित्रपटसृष्टीचा भाग आहेत.
