Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pushpa 2 साठी अल्लू अर्जुने घेतलं तब्बल इतक्या कोटींचं मानधन; बनवला इंडस्ट्रीत नवीन रेकॉर्ड

‘पुष्पा : द रूल’मध्ये अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल यांची टक्कर पहायला मिळणार आहे. पुष्पासोबतच श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदाना यामध्ये मुख्य भूमिकेत असेल. पुष्पा 2 हा पहिल्या भागापेक्षा अधिक रंजक करण्याचा प्रयत्न निर्माते-दिग्दर्शकांचा आहे.

Pushpa 2 साठी अल्लू अर्जुने घेतलं तब्बल इतक्या कोटींचं मानधन; बनवला इंडस्ट्रीत नवीन रेकॉर्ड
Pushpa 2 Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 4:02 PM

हैदराबाद : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा : द राइज’ हा 2021 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटातील गाण्यांनी आणि डायलॉग्सने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. त्याचसोबत पहिल्या भागाची कथा अशा वळणावर येऊन थांबवी, ज्यानंतर सीक्वेलविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाचं औचित्य साधत निर्मात्यांनी 7 एप्रिल रोजी संध्याकाळी ‘पुष्पा : द रुल’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. या ट्रेलरमुळे कथेविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्याचसोबत आता या सीक्वेलसाठी अल्लू अर्जुनने घेतलेल्या फीबाबत माहिती समोर आली आहे.

पुष्पाचा पहिला भाग हिट झाल्यानंतर अल्लू अर्जुनने सीक्वेलसाठी दुप्पट फी आकारली आहे. ‘पुष्पा : द रूल’साठी त्याने तब्बल 85 कोटी रुपये स्वीकारल्याचं कळतंय. हा तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतला एक नवीन रेकॉर्ड बनला आहे. दुसऱ्या भागाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे की पुष्पा तिरुपती तुरुंगातून फरार झाला आहे. त्याला आठ गोळ्या लागल्या आहेत. त्यामुळे तो जिवंत असण्याची शक्यता खूपच कमी आहे. ही बातमी समोर येताच पुष्पाचे समर्थक भडकले आहेत.

हे सुद्धा वाचा

पुष्पाचे समर्थक विरोध प्रदर्शन करत त्याने केलेल्या चांगल्या कामाचे दाखले देऊ लागतात. त्याच्यामुळे कशाप्रकारे एका मुलाला जीवनदान मिळालं, तर दुसऱ्याला राहण्यासाठी घर मिळालं, असं ते सांगू लागतात. एकीकडे पुष्पाचे चाहते त्याच्या नावाने घोषणा देत असतात, तर दुसरीकडे पोलीस त्यांच्यावर लाठीमार आणि पाण्याचा वर्षाव करतात. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो, तो म्हणजे ‘पुष्पा कुठे आहे?’

या ट्रेलरमध्ये पुढे दाखवण्यात आलं की एका वृत्तवाहिनीला क्लिप मिळते. ज्या जंगलात मोठ्या संख्येने वाघ असतात, तिथला हा व्हिडीओ असतो. यामध्ये पुष्पासारखी दिसणारी एक व्यक्ती पाठमोरी चालताना दिसते. जंगलाच्या अंधारात अखेरीस पुष्पाचा चेहरा समोर येतो. हा सीक्वेल कधी प्रदर्शित होणार याची अद्याप घोषणा करण्यात आली नाही. मात्र ‘पुष्पा 2’ या वर्षाच्या अखेरीस किंवा 2024 च्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय.

‘पुष्पा : द रूल’मध्ये अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल यांची टक्कर पहायला मिळणार आहे. पुष्पासोबतच श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदाना यामध्ये मुख्य भूमिकेत असेल. पुष्पा 2 हा पहिल्या भागापेक्षा अधिक रंजक करण्याचा प्रयत्न निर्माते-दिग्दर्शकांचा आहे. त्यामुळे या सीक्वेलमध्ये दमदार कलाकारांची वर्णी लागली आहे. या चित्रपटात प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं कळतंय.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.