AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ALPHA Teaser: शर्वरी कुठे आहे ? ‘अल्फा’च्या टीझरमध्ये झलकही न दिसल्याने चाहते नाराज, आलियाला म्हणाले…

ALPHA Teaser : आलिया भट्ट, शर्वरी वाघ आणि बॉबी देओल स्टारर 'अल्फा' चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला. मात्र 1. मिनिट 55 सेकंदांच्या या टीझरमध्ये पक्त आलिया भट्ट आणि बॉबी देओल हेच दोघे दिसले. चित्रपटातील दोन प्रमुख कलाकारांपैकी एक असलेली शर्वरी वाघ हिचा कुठेच मागमूस नव्हता. यामुळे चाहते नाराज झाले असून त्यांनी शर्वरीबद्दल अनेक प्रश्न विचारण्यास सुरूवात केली आहे.

ALPHA Teaser:  शर्वरी कुठे आहे ? 'अल्फा'च्या टीझरमध्ये झलकही न दिसल्याने चाहते नाराज, आलियाला म्हणाले...
अल्फामध्ये आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांची प्रमुख भूमिका आहे.
| Updated on: Jun 11, 2026 | 10:04 AM
Share

ALPHA Teaser : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांची मोस्ट अवेटेड फिल्म, ‘अल्फा’ चा टीझर काल लाँच करण्यात आला. यशराज बॅनरखाली बनलेल्या या फिल्ममध्ये बॉबी देओल याचीही महत्वाची भूमिका आहे. 1 मिनिट 55 सेकंदांचा हा व्हिडीओ समोर येताच चाहत्यांनी तो पाहून झटपट प्रतिक्रिया दिल्या. अनेकांना हा टीझर, चित्रपटाचा लूक खूप आवडला, पण या टीझरमध्ये शर्वरीची झलकही न दिसल्याने अनेक जण नाराज झाले. कमेंट्समध्ये असंख् लोकांवी शर्वरीबाबात प्रश्न विचारले. शर्वरी कुठे आहे, ती कधी दिसणार असा सवाल करत लोकांनी कमेंट्स केल्या.

कसा आहे अल्फाचा टीझर ?

1 मिनिट 55 सेकंदांच्या ‘अल्फा’च्या या टीझरमध्ये केवळ आलिया भट्ट आणि बॉबी देओल यांची झलक पाहायला मिळाली; यात शर्वरी कुठेही दिसली नाही. मात्र शर्वरीला अजिबातच का दाखवलं नाही, असा सवाल टीझर प्रदर्शित होताच अनेक लोकांच्या मनात निर्माण झाला.

सोशल मीडियावरील युजर्सनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. शर्वरी नक्की कुठे आहे? असं ‘अल्फा’चा टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांनी विचारायला सुरूवात केली. मात्र एका युजरच्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. , “असं वाटतं की शर्वरी वाघला तिच्या वाढदिवशी, म्हणजेच 14 जून रोजी ‘अल्फा’मधील तिच्या भूमिकेत सादर केले जाईल.” अशी कमेंट त्याने केली. मात्र पहिल्या टीझरमध्ये शर्वरी न दिसल्याने अनेक चाहत्यांचा भ्रमनिरास झाला. शर्वरी तु कुठे आहे, असेही एकाने विचारले.

कधी रिलीज होणार चित्रपट ?

मात्र ‘अल्फा’च्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. सुरुवातीला हा चित्रपट एप्रिल 2026 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, नंतर ती तारीख बदलून 10 जुलै करण्यात आली. आता, काही रिपोर्ट्सनुसार, 3 जुलै रोजी चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.

शर्वरीचे आगामी प्रोजेक्ट्स

अल्फा व्यतिरिक्त शर्वरी वाघ ही, इम्तियाज अली यांच्या ‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत वेदांग रैना देखील झळकणार आहे. हा चित्रपट 12 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप