AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्रीच्या मुस्लीम बॉयफ्रेंडने ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणण्यास दिला नकार? ट्रोलर्स म्हणाले ‘आलाच का?’

देशभरात गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. अशाच एका सेलिब्रिटीच्या घरातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्री जास्मिन भसीन तिच्या बॉयफ्रेंडला जयघोष म्हणायला सांगते, पण तो म्हणत नाही.

अभिनेत्रीच्या मुस्लीम बॉयफ्रेंडने 'गणपती बाप्पा मोरया' म्हणण्यास दिला नकार? ट्रोलर्स म्हणाले 'आलाच का?'
अली गोणी आणि जास्मिन भसीनImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 04, 2025 | 1:32 PM
Share

महाराष्ट्र आणि देशातील इतर भागात गणेशोत्सव अत्यंत जल्लोषात साजरा केला जात आहे. संपूर्ण देशभरात जरी गणेश चतुर्थी साजरी केली जात असली तर महाराष्ट्रात या उत्सवाचं विशेष महत्त्व आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये वाजत-गाजत गणपती बाप्पाची मूर्ती आणली जाते आणि मनोभावे त्यांची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीनिमित्त विविध मंडळांमध्ये कार्यक्रमही आयोजित केले जातात. अशाच एका कार्यक्रमात टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील काही सेलिब्रिटी उपस्थित होते. यामध्ये निया शर्मा, जास्मिन भसीन, अली गोणी, समर्थ जुरेल, भारती सिंह, कृष्णा अभिषेक, सुदेश लहरी, कश्मीरा शाह यांचा समावेश होता. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री जास्मिन भसीन तिच्या बॉयफ्रेंडला ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करायला सांगते. परंतु अली गोणी काहीच न म्हणता फक्त हसतो. या क्लिपमध्ये जास्मिनसोबत अभिनेत्री निया शर्मासुद्धा दिसतेय. निया आणि जास्मिन बाप्पाच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचत जयघोष करू लागतात. तेव्हाच बाजूला उभ्या असलेल्या बॉयफ्रेंड अली गोणीकडे वळत जास्मिन त्याचे गाल पकडते. जणू ती इशाऱ्याने अलीलाही जयघोष म्हणायला सांगते, असं वाटतं. परंतु अली फक्त हसतो. पुढे काहीच म्हणत नाही. यावरून त्याने ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणण्यास नकार दिल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे आणि त्यावरून विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

इतकं अस्वस्थ वाटत असेल तर यायचं कशाला? जास्मिनने तिच्या रिलेशनशिपबद्दल पुन्हा विचार करावा, असा सल्ला एकाने दिला. तर ‘जर त्याला बोलायचं नव्हतं, तर मग तो आलाच कशाला’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला. यात काहींनी अलीचीही बाजू घेतली. जर अली जास्मिनवर त्याच्या धर्माच्या बाबतीत कोणती बंधने आणत नाही, तर ती का असं वागतेय, असा सवाल नेटकऱ्यांनी केला. जास्मिन पंजाबी आणि अली मुस्लीम असल्याने हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

यादरम्यान अली गोणीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गणेश चतुर्थीचे काही फोटो पोस्ट केले आहेत. टीव्ही इंडस्ट्रीतील मित्रपरिवारासोबतचे त्याचे हे फोटो आहेत. ‘कुटुंब’ असं कॅप्शन देत त्याने हे फोटो पोस्ट केले होते. परंतु त्यातही गणपती बाप्पाची मूर्ती न दिल्याने नेटकऱ्यांनी अलीला प्रश्न विचारले.

राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.