AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amber Heard: “दारुच्या बाटलीने माझ्या प्रायव्हेट पार्ट्सना केली दुखापत”; जॉनी डेपवर Ex वाइफचे गंभीर आरोप

जॉनीवर त्याची पूर्वाश्रमीची पत्नी आणि अभिनेत्री अँबर हर्डने (Amber Heard) गंभीर आरोप केले आहेत. या दोघांच्या कोर्टकचेरी प्रकरणाने सध्या हॉलिवूडमधील अनेकांचं लक्ष वेधलं आहे. गुरुवारी पार पडलेल्या सुनावणीत अँबरने जॉनीवर मारहाण आणि लैंगिक शोषण (Sexually Assaulted) केल्याचा आरोप केला.

Amber Heard: दारुच्या बाटलीने माझ्या प्रायव्हेट पार्ट्सना केली दुखापत; जॉनी डेपवर Ex वाइफचे गंभीर आरोप
Johnny Depp and Amber HeardImage Credit source: AFP
| Edited By: | Updated on: May 06, 2022 | 5:10 PM
Share

‘पायरेट्स ऑफ कॅरेबियन’ या प्रसिद्ध हॉलिवू़ड चित्रपटातील अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. तीन वेळा ऑस्कर नामांकन मिळवलेला आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार आपल्या नावे केलेल्या जॉनीवर त्याची पूर्वाश्रमीची पत्नी आणि अभिनेत्री अँबर हर्डने (Amber Heard) गंभीर आरोप केले आहेत. या दोघांच्या कोर्टकचेरी प्रकरणाने सध्या हॉलिवूडमधील अनेकांचं लक्ष वेधलं आहे. गुरुवारी पार पडलेल्या सुनावणीत अँबरने जॉनीवर मारहाण आणि लैंगिक शोषण (Sexually Assaulted) केल्याचा आरोप केला. 2015 मध्ये लग्नानंतर ऑस्ट्रेलियामध्ये जॉनीने गैरवर्तणूक केल्याचं तिने सांगितलं. त्यावेळी ती ‘डॅनिश गर्ल’ या चित्रपटाचं शूटिंग संपवून ऑस्ट्रेलियाला जॉनीला भेटायला गेली होती. तेव्हा जॉनी ‘पायरेट्स ऑफ कॅरेबियन 5’ची शूटिंग करत होता.

“जॉनीने मला ड्रग्ज घेण्यास बळजबरी केली होती. मी नकार दिल्यावर त्याने दारू पिण्यास सुरुवात केली. यामुळे आमच्यात भांडण सुरू झालं. भांडणादरम्यान जॉनीने मला भिंतीवर ढकलून मारलं. काचेच्या दारूच्या बाटलीने त्याने मला धमकी दिली. काचेनं माझा गळा चिरण्याची धमकी त्याने दिली. दारूच्या नशेत त्याने माझ्याशी बळजबरीने शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच काचेच्या बाटलीने त्याने माझ्या प्रायव्हेट पार्ट्सना दुखापत केली,” अशा शब्दांत अँबरने घडलेला प्रसंग सांगितला. हे सांगताना ती कोर्टात ढसाढसा रडत होती.

नेमकं काय आहे प्रकरण?

जॉनी डेपने अँबरविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. 2018 मध्ये वॉशिंग्टन पोस्टमध्ये अँबरचा एक लेख छापून आला होता. या लेखात तिने कौटुंबिक हिंसाचाराबद्दल लिहिलं होतं. मात्र त्यात तिने कोणाचाही उल्लेख केला नव्हता. तरीही जॉनीने या लेखातून आपली बदनामी होत असल्याचा दावा करत अँबरविरोधात 50 दशलक्ष डॉलर्सचा मानहानीचा खटला दाखल केला. याविरोधात अँबरनेही जॉनीविरोधात 100 दशलक्ष डॉलर्सचा खटला दाखल केला. याच खटल्याची सुनावणी सध्या सुरू आहे. याआधी 2016 मध्येही अँबरने जॉनीविरोधात मारहाणीचा आरोप केला होता.

अँबर आणि जॉनीचं लग्न

2011 मध्ये ‘द रम डायरी’ या हॉलिवूड चित्रपटाच्या सेटवर या दोघांची पहिल्यांदा भेट झाली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि काही महिन्यांनंतर ते एकमेकांना डेट करू लागले. 2012 पासून या दोघांनी एकमेकांना डेट केलं आणि डेटिंगच्या तीन वर्षांनंतर 2015 मध्ये त्यांनी लग्न केलं. लग्नाच्या 15 महिन्यांतच त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला. अँबरने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आणि चेहऱ्यावरील मारहाणीची खूण दाखवत जॉनीविरोधात रेस्ट्रेनिंग ऑर्डरची मागणी केली होती. जॉनीने घटस्फोटानंतर अँबरला सात दशलक्ष डॉलर्स दिले होते.

कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.