AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमीषा पटेल हिला शाहरुख, सलमान आणि संजय दत्त यांचे चित्रपट नाकारणे पडले अत्यंत महागात, थेट करिअर कोलमडले आणि

सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट धमाका करताना दिसत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे जोरदार प्रेम मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडण्यासही सुरूवात केलीये. गदर 2 चित्रपटामध्ये सनी देओल याच्यासोबत अमीषा पटेल देखील मुख्य भूमिकेत आहे.

अमीषा पटेल हिला शाहरुख, सलमान आणि संजय दत्त यांचे चित्रपट नाकारणे पडले अत्यंत महागात, थेट करिअर कोलमडले आणि
| Updated on: Aug 18, 2023 | 10:57 PM
Share

मुंबई : गदर 2 हा चित्रपट धमाका करताना दिसत आहे. सनी देओल याचा हा चित्रपट (Movie) अनेक रेकाॅर्ड तोडण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे हे चित्र बऱ्याच वर्षांनी बघायला मिळत आहे की, बाॅलिवूड चित्रपटासाठी थिएटरबाहेर मोठ्या रांगा लागल्याचे. काही दिवसांपूर्वीच थिएटर बाहेरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओमध्ये गदर 2 (Gadar 2) चित्रपट पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळाले. विशेष म्हणजे प्रेक्षकांमध्ये गदर 2 चित्रपटाबद्दल एक मोठे क्रेझ हे बघायला मिळत आहे.

गदर 2 चित्रपट धमाका करत आहे. विशेष म्हणजे गदर 2 हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नक्कीच आहे. 22 वर्षांनतंर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा एकदा आलाय आणि या चित्रपटाने पहिल्यांच दिवशी धमाकेदार कामगिरी केलीये. गदर 2 चित्रपटात सनी देओल याच्यासोबत अमीषा पटेल मुख्य भूमिकेत आहे. अमीषा पटेल हिचा चाहता वर्गही मोठा आहे.

विशेष म्हणजे अमीषा पटेल हिने आपल्या करिअरची सुरूवात एका हिट चित्रपटानेच केलीये. अमीषा पटेल हिने कहो ना प्यार है या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. या चित्रपटात अमीषा पटेल ऋतिक रोशन याच्यासोबत मुख्य भूमिकेत होती. विशेष म्हणजे ऋतिक रोशन आणि अमीषा पटेल यांचा कहो ना प्यार है हा चित्रपट हिट ठरला.

कहो ना प्यार है या चित्रपटानंतर अमीषा पटेल हिला गदर या चित्रपटाची आॅफर आली. अमीषा पटेल हिचा कहो ना प्यार है या चित्रपटानंतर गदर हा चित्रपट देखील हिट ठरला. एका मागून एक हिट चित्रपट दिल्याने अमीषा पटेल चांगलीच चर्चेत आली आणि तिच्याकडे काही मोठ्या चित्रपटांच्या आॅफर देखील आल्या. सलमान खान याच्या चित्रपटाची आॅफर देखील तिच्याकडे होती.

अमीषा पटेल हिला चलते चलते, मुन्ना भाई एमबीबीएस आणि तेरे नाम या चित्रपटाच्या आॅफर आल्या होत्या. मात्र, अमीषा पटेल हिने या तीनही चित्रपटांना नकार दिला. अमीषा पटेल हिला या चित्रपटांना नकार देणे अत्यंत महागात पडले होते. मात्र, त्यावेळी तिने इतर चित्रपट साईन केल्याने या चित्रपटांसाठी तिच्याकडे डेट शिल्लक नव्हत्या.

अमीषा पटेल हिने या चित्रपटांना नकार दिला आणि हे चित्रपट हिट ठरले. मात्र, त्यावेळी अमीषा पटेल हिने केलेले चित्रपट फ्लाॅप जाताना दिसले आणि तिला चित्रपटांच्या आॅफर येणे देखील बंद झाले. एक निर्णय आपल्या करिअरमध्ये अमीषा पटेल हिला अत्यंत महागात नक्कीच पडला. जर कदाचित ते तीन चित्रपट तिने केले असते तर आज वेगळ्या स्थानी नक्कीच असती.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!