AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gadar 2 | सनीने धर्मेंद्र नाही तर देओल कुटुंबातील ‘या’ व्यक्तीला दिलं ‘गदर 2’च्या यशाचं श्रेय

'गदर 2' या चित्रपटाने स्वातंत्र्यदिनी इतिहास रचला आहे. 15 ऑगस्ट रोजी या चित्रपटाची सर्वाधिक कमाई झाल्याचं पहायला मिळालं. 11 ऑगस्ट रोजी सनी देओलच्या 'गदर 2'सोबतच अक्षय कुमारचा OMG 2 हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित झाला.

Gadar 2 | सनीने धर्मेंद्र नाही तर देओल कुटुंबातील 'या' व्यक्तीला दिलं 'गदर 2'च्या यशाचं श्रेय
Gadar 2Image Credit source: Twitter
| Updated on: Aug 16, 2023 | 12:15 PM
Share

मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर 2’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करतोय. अवघ्या पाच दिवसांत या चित्रपटाने तब्बल 228.98 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाचे शोज संपूर्ण देशभरात हाऊसफुल्ल होत आहेत. तब्बल 22 वर्षांनंतर ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. ‘गदर 2’मुळे बॉलिवूडला पुन्हा एकदा ‘अच्छे दिन’ आले आहेत, असं म्हणायला हरकत नाही. चित्रपटाच्या या यशाचं श्रेय सनी देओलने त्यांच्या कुटुंबातील एका खास व्यक्तीला दिलं आहे. विशेष म्हणजे या खास व्यक्तीचा नुकताच देओल कुटुंबात समावेश झाला आहे.

‘गदर 2’ला मिळणारं हे यश म्हणजे सून द्रिशा आचार्यचा पायगुण आहे, असं सनी देओल मानतो. मुलगा करण देओलची पत्नी द्रिशा ही ‘गृहलक्ष्मी’ असल्याचं त्याने म्हटलंय. देओल कुटुंबात द्रिशा येताच अनेक चांगल्या गोष्टी घडताना दिसत आहे. त्यामुळे तिच्या येण्यानेच ही समृद्धी आणि यश मिळाल्याचं सनी देओल मानत आहे. केवळ चित्रपटाचं यशच नव्हे तर सावत्र बहीण ईशा देओल हिच्यासोबतचेही दुरावे मिटले आहेत. ईशाने तिच्या भावासाठी चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगचं आयोजन केलं होतं. त्यावेळी सनी देओल आणि बॉबी देओलने आवर्जून हजेरी लावली होती. बऱ्याच वर्षांनंतर हे तिघे एकत्र मीडियासमोर दिसले होते.

View this post on Instagram

A post shared by Karan Deol (@imkarandeol)

सनी देओलचा मुलगा करण देओलने 18 जून रोजी गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यशी लग्न केलं. या लग्नसोहळ्याला संपूर्ण देओल कुटुंब उपस्थित होतं. या लग्नसोहळ्यात बऱ्याच वर्षांनंतर धर्मेंद्र हे त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत दिसले. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांचा फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

‘गदर 2’ या चित्रपटाने स्वातंत्र्यदिनी इतिहास रचला आहे. 15 ऑगस्ट रोजी या चित्रपटाची सर्वाधिक कमाई झाल्याचं पहायला मिळालं. 11 ऑगस्ट रोजी सनी देओलच्या ‘गदर 2’सोबतच अक्षय कुमारचा OMG 2 हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित झाला. त्याचीही समाधानकारक कमाई होत आहे. पण जर ‘गदर 2’ हा एकच चित्रपट प्रदर्शित झाला असता तर कमाईचा आकडा आणखी अधिक असता, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत.

‘गदर 2’ची आतापर्यंतची कमाई-

शुक्रवार- 40.10 कोटी रुपये शनिवार- 43.08 कोटी रुपये रविवार- 51.70 कोटी रुपये सोमवार- 38.70 कोटी रुपये मंगळवार- 55.40 कोटी रुपये एकूण- 228.98 कोटी रुपये

पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.