Vaalvi | बॉक्स ऑफिसच्या शर्यतीत शाहरुखचा ‘पठाण’ असताना मराठी चित्रपट ‘वाळवी’ची दमदार कामगिरी

या आठवड्यातही काही थिएटर्समध्ये 'वाळवी'चे शोज तिप्पट वाढवण्यात आले आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा होती. समीक्षक, मराठी सिनेसृष्टी, प्रेक्षक अशा सर्वांनीच 'वाळवी'चं भरभरून कौतुक केलं आहे.

Vaalvi | बॉक्स ऑफिसच्या शर्यतीत शाहरुखचा 'पठाण' असताना मराठी चित्रपट 'वाळवी'ची दमदार कामगिरी
Vaalvi | बॉक्स ऑफिसच्या शर्यतीत शाहरुखचा 'पठाण' असताना मराठी चित्रपट 'वाळवी'ची दमदार कामगिरीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 5:59 PM

मुंबई: बॉक्स ऑफिसवर सध्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाचीच चर्चा आहे. मात्र या पठाणला दमदार टक्कर देत एका मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तिसरा यशस्वी आठवडा गाठला आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘वाळवी’. पठाणसारखा बिग बजेट चित्रपट शर्यतीत असतानाही ‘वाळवी’ चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यातही आपलं स्थान कायम ठेवलं आहे. या आठवड्यातही काही थिएटर्समध्ये ‘वाळवी’चे शोज तिप्पट वाढवण्यात आले आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा होती. समीक्षक, मराठी सिनेसृष्टी, प्रेक्षक अशा सर्वांनीच ‘वाळवी’चं भरभरून कौतुक केलं आहे.

प्रेक्षकांकडून भरभरून मिळणाऱ्या या प्रतिसादाबद्दल झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणाले, “तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद समाधान देणारा आहे. अनेक ठिकाणी प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आणि प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून ‘वाळवी’चे शोज वाढवण्यात आले आहेत. सध्या ‘पठाण’ सारख्या बॉलिवूड चित्रपटाची चलती असतानाही ‘वाळवी’वरही प्रेक्षक तेवढेच प्रेम करत आहेत. हिंदी चित्रपटासमोर मराठी चित्रपट ताकदीने उभा आहे, हेच खूप आनंददायी आहे. मुळात मराठी प्रेक्षकवर्ग हा चोखंदळ आहे. चांगल्या कॅान्टेटला ते नेहमीच पसंती देतात आणि म्हणूनच ते असे चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघतात. ‘वाळवी’ हा सुद्धा असाच वेगळा विषय असून हा मराठीतील पहिला थ्रिलकॉम चित्रपट आहे.”

हे सुद्धा वाचा

झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी ‘वाळवी’ची निर्मिती केली असून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.