प्रेमासाठी आईकडून चप्पलने मार खाल्ला, विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात करिअर उद्ध्वस्त; बॉलिवूड अभिनेत्री 50 व्या वर्षीही सिंगल
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी वयाची 40 ते 50 वर्षे ओलांडली आहेत, पण अजूनही अविवाहित आहेत. अशीच एक अभिनेत्री आहे जी 50 व्या वर्षीही आहे अविवाहित. याचं कारण म्हणजे प्रेमात मिळालेला विश्वासघात.

बॉलिवूडमध्ये घटस्फोट, ब्रेकअप, अफेअर, किंवा विवाहबाह्य रिलेशन, या सगळ्या गोष्टी अगदीच सामान्य आहेत. यातील अनेक कलाकार ब्रेकअपनंतर किंवा घटस्फोटानंतर दुसऱ्या जोडीदारासोबत त्यांचं आयुष्य निवडतात. परंतु बरेच जण अजूनही अविवाहित राहतात. अशीच एक बॉलिवूड अभिनेत्री आहे जिचे चित्रपट बॉलिवूडवर सुपरहीट ठरायचे. पण गेल्या अनेक वर्षांपासून ती सिंगलच आयुष्य जगतेय. याचं कारण म्हणजे तिचा झालेला प्रेमभंग.
ही अभिनेत्री आहे अमिषा पटेल. नुकताच तिने तिचा 50 वा वाढदिवस साजरी केली. अमिषा पटेलने तिच्या कारकिर्दीची सुरुवात एका ब्लॉकबस्टर चित्रपटाने केली होती आणि ती तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली.
अमिषाच्या लव्ह लाईफबद्दलही चर्चा
अमिषा पटेल अलिकडेच उद्योगपती निर्वाण बिर्लासोबतच्या तिच्या कथित संबंधांमुळे चर्चेत होती. तिने निर्वाणसोबतचे तिचे गोड फोटोही शेअर केले होते. पण या नात्यावर तिने काहीह प्रतिक्रिया दिली नाही. तथापि, एक काळ असा होता जेव्हा अमिषा एका विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली. आपण प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक विक्रम भट्टबद्दल बोलत आहोत, ज्याच्यावर प्रेम करून अमिषाने तिचे चांगले करिअर उद्ध्वस्त केले.
एका विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात करिअर उद्ध्वस्त
अमिषा पटेल विवाहित दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या प्रेमात पडली, पण काही वर्षांतच त्यांचे नाते तुटले. या नात्यामुळे तिच्या कुटुंबाशी असलेल्या नात्यावरही मोठा परिणाम झाला, पण अमिषाने विक्रम भट्टसाठी सर्वस्व पणाला लावले. अमिषा पटेलने एका मुलाखतीत म्हटले होते की, विक्रम भट्ट यांच्याशी असलेल्या नात्यामुळे तिचे करिअर उद्ध्वस्त झाले. या नात्यामुळे ती एका दशकाहून अधिक काळ पुरुषांपासून दूर राहिली.
View this post on Instagram
या नात्यांचा माझ्या करिअरवर परिणाम झाला
अमिषा पटेलने एका मुलाखतीत विक्रम भट्टसोबतच्या तिच्या नात्याबद्दल उघडपणे सांगितले होते की, ‘ही अशी इंडस्ट्री आहे जिथे प्रामाणिकपणाचे स्वागत केले जात नाही. आणि मी अशा लोकांपैकी एक आहे जे खूप प्रामाणिक आहेत. मी अशा लोकांपैकी एक आहे जे मनमोकळेपणाने बोलण्यावर विश्वास ठेवतात. मला वाटते की ही माझ्यातील सर्वात मोठी कमतरता आहे. मी सार्वजनिकरित्या नातेसंबंध स्वीकारले होते. आणि या नात्यांचा माझ्या करिअरवर परिणाम झाला. त्यानंतर मी 12 ते 13 वर्षे माझ्या आयुष्यात कोणत्याही पुरुषाला स्थान दिले नाही. त्यावेळी मला माझ्या आयुष्यात फक्त शांती हवी होती.’
आईने मला चप्पलने मारले होते
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा अमिषा पटेलच्या आईवडिलांना विक्रम भट्टसोबतच्या तिच्या अफेअरबद्दल कळले तेव्हा ते खूप संतापले. अभिनेत्रीने पत्रकार परिषदेत याचा उल्लेख केला आणि सांगितले की जेव्हा तिच्या आईला हे कळले तेव्हा तिने तिला चप्पलने मारहाण केली. अमिषा म्हणाली होती- ‘माझ्या आईने एकदा मला चप्पलने मारहाण केली. तिला माझ्या नात्याबद्दल कळले. तिने मला घराबाहेरही हाकलून लावले.’