अमिताभ बच्चन यांच्यासोबत लॉन्ग ड्राईव्हवर निघालेल्या रेखा, कधीही न पाहिलेले ‘ते’ फोटो अखेर समोर
Amitabh Bachchan And Rekha Unseen Phooto: अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे कधीही न पाहिलेले फोटो अखेर समोर, लॉन्ग ड्राईव्ह आणि दोघांचे 'ते' खास क्षण..., सध्या दोघांचे फोटो सर्वत्र होत आहेत तुफान व्हायरल

Amitabh Bachchan And Rekha Unseen Phooto: महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि एव्हर ग्रीन अभिनेत्री रेखा (Rekha) यांच्या नात्याबद्दल आज कोणाला काहीही सांगण्याची गरज नाही. एक काळ असा होता जेव्हा बिग बी आणि रेखा यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. फक्त रिल लाईफ मध्येच नाही तर, रियल लाईफमध्ये देखील दोघांच्या जोडीला चाहत्यांनी विशेष पसंती दिली. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली. 1981 साली प्रदर्शित झालेला ‘सिलसिला’ हा सिनेमा बिग आणि रेखा यांचा शेवटचा सिनेमा ठरला… आता दोघांचे कधीच न पाहिलेले काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये बिग बी आणि रेखा एकमेकांसोबत आनंदी दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये अमिताभ बच्चन एका व्हिंटेज कारमध्ये बसलेले दिसत आहे. थंडीचे दिवस असल्यामुळे दोघांनी देखील खास लूक कॅरी केल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये बिग बी आणि रेखा दोघे चांगले दिसत आहे. सध्या व्हायरल होत असलेले फोटो त्या काळचे आहेत जेव्हा रेखा आणि अमिताभ बच्चन त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होते.
दोघांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली कारण तेव्हा अमिताभ बच्चन विवाहित होते. सर्वात आधी दोघांचे हे फोटो रेडिटवर दिसण्यात आले. त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले. आज रेखा आणि अमिताभ बच्चन त्यांच्या आयुष्यात फार पुढे निघून गेले आहेत, पण रेखा आजही बिग बी यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना दिसतात.

‘सिलसिला’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, दिग्दर्शत यश चोप्रा दिग्दर्शित सिनेमात अमिताभ बच्चन, रेखा यांच्यासोबत जया बच्चन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या. सिनेमात रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये प्रचंड प्रेम असल्याचं दाखवण्यात आलं. पण काही कारणांमुळे अमिताभ बच्चन यांना जया याच्यासोबत लग्न करावं लागतं.
मर्जीविरुद्ध लग्न झाल्यानंतर रेखा आणि अमिताभ बच्चन यांचं नातं संपत नाही… सिनेमाची कथा थोडीफार अमिताभ बच्चन, रेखा आणि जया बच्चन यांच्या खऱ्या आयुष्याप्रमाणे आहे… सिनेमाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण ‘सिलसिला’ सिनेमानंतर रेखा आणि बिग बी कधीच एकत्र दिसले नाहीत. आता अनेक वर्षांनंतर रेखा आणि अमिताभ बच्चन यांचे काही फोटो व्हायरल झाल्यामुळे पुन्हा त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे.
