राक्षस ने कहा तू जाके ” … ” को बता; अखेर अमिताभ बच्चन यांची ऑपरेशन सिंदूरवर सोडलं मौन

ऑपरेशन सिंदूरवर अखेर अमिताभ बच्चन यांनी मौन सोडलं आहे. एक्स अकाऊंटवर त्यांनी पोस्ट लिहित दहशतवादी हल्ला आणि त्याला भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे दिलेलं उत्तर, याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. बिग बींची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राक्षस ने कहा तू जाके  …  को बता; अखेर अमिताभ बच्चन यांची ऑपरेशन सिंदूरवर सोडलं मौन
Amitabh Bachchan
Image Credit source: Instagram
| Updated on: May 11, 2025 | 8:57 AM

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या 18 दिवसांनंतर अखेर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहित मौन सोडलं आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांना लक्ष्य केलं. त्यानंतर 23 एप्रिलपासून ते फक्त ब्लँक ट्विट पोस्ट करत होते. यावरून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली. अखेर 11 मे रोजी त्यांनी ऑपरेशन सिंदूरवर पहिली पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांच्या कवितेच्या काही ओळीसुद्धा लिहिल्या आहेत. बिग बींची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

अमिताभ बच्चन यांची पोस्ट-

‘छुट्टियाँ मानते हुए उस राक्षस ने निर्दोष पति पत्नी को बाहर खींच कर, पति को नग्न कर, उसके धर्म की पूर्ति करने के बाद, उसे जब गोली मारने लगा. तो पत्नी ने घुटने पे गिर कर, रो रो अनुरोध करने के बाद भी, की उसके पति को न मारो; उसके पति को उस बुज़दिल राक्षस ने, बेहद बेरहमी से, गोली मार कर, पत्नी को विधवा बना दिया! जब पत्नी ने कहा “मुझे भी मार दो”, तो राक्षस ने कहा “ नहीं! तू जाके ” …. ” को बता”. बेटी की मनःस्थिति पर पूज्य बाबूजी की एक कविता की पंक्ति याद आयी:
मानो, वो बेटी ” …. “ के पास गई, और कहा:
“है चिता की राख कर में, माँगती सिंदूर दुनिया” (बाबूजी की पंक्ति)
तो “ …. “ ने दे दिया सिंदूर! OPERATION SINDOOR!
जय हिन्द
जय हिन्द की सेना
तू ना थमें गा कभी; तू न मुड़ेगा कभी; तू न झुकेगा कभी
कर शपथ, कर शपथ, कर शपथ
अग्नि पाथ! अग्नि पाथ ! अग्नि पाथ !’

(त्या राक्षसाने पती-पत्नीला बाहेर खेचलं, पतीला नग्न केलं, त्याला त्याचा धर्म विचारल्यानंतर जेव्हा गोळ्या झाडल्या, तेव्हा पत्नीने गुडघ्यावर बसून रडत-रडत विनंती केली. तरीसुद्धा त्याने पतीला मारलं. तिच्या पतीला त्या भित्र्या राक्षसाने अत्यंत निर्दयीपणे गोळ्या झाडून मारलं आणि पत्नीला विधवा केलं. जेव्हा पत्नीने म्हटलं, ‘मलासुद्धा मारून टाका, तेव्हा राक्षसाने म्हटलं, नाही.. तू जाऊन “… ” ला सांग. मुलीच्या मनस्थितीवर मला वडिलांच्या कवितेतील ओळ आठवली. समजा ती मुलगी … कडे गेली आणि म्हणाली, है चिता की राख कर में, माँगती सिंदूर दुनिया (वडिलांच्या कवितेतील ओळ) तो “ …. “ ने दे दिया सिंदूर. ऑपरेशन सिंदूर.’) 

अमिताभ बच्चन यांनी एकूण 19 ब्लँक पोस्ट केले. त्यानंतर आता विसाव्या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी मोदींचा थेट उल्लेख केला नाही, परंतु ऑपरेशन सिंदूरचं कौतुक केलं आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी विशेषकरून पुरुषांना धर्मावरून लक्ष्य केलं होतं. इतकंच नव्हे तर “जाऊन मोदीला सांग, आम्ही काय केलं तं” अशी धमकी त्यांनी महिलांना दिली होती. मोदींनी त्या दहशतवाद्यांना ऑपरेशन सिंदूरद्वारे सडेतोड उत्तर दिल्याचं बिग बींनी या पोस्टमध्ये लिहिलंय.