AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर पैसे मागायला कर्जदारांची रांग लागायची; अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी सांगितला बिग बींचा तो काळ

प्रत्येक बॉलिवूड कलाकाराच्या आयुष्यात एक तरी असा दिवस येतो तेव्हा तो अनेक अडचणींच्या काळातून जात असतो. असाच एक काळ अमिताभ बच्चन यांच्याही आयुष्यात आला होता. पैशांसाठी त्यांच्या घराबाहेर कर्जदारांच्या रांगा लागायच्या, या काळातही त्यांनी स्वत:ला कसं सावरलं हे आशिष विद्यार्थी यांनी सांगितलं आहे.

अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर पैसे मागायला कर्जदारांची रांग लागायची; अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी सांगितला बिग बींचा तो काळ
Amitabh Bachchan Financial Struggles, Veteran Actor Ashish Vidyarthi Reveals Big B Dark DaysImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 01, 2025 | 1:40 PM
Share

बॉलीवूडमध्ये 70 ते 80 च्या दशकापासून ते आजपर्यंत आपल्या अभिनयाची जादू कायम ठेवणाऱ्या आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अमिताभ बच्चन यांचा अभिनयाचा प्रवास आणि त्यासाठी त्यांनी केलेली मदत हे सर्वांनाच माहित आहे. अनेकदा बिग बींना देखील अपयशाचा सामना करावा लागला आहे. पण त्यातूनही ते मोठ्या हिंमतीने बाहेर निघाले आहे. त्यांना स्वत: याबदद्ल अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे.

अमिताभ यांच्या घराच्या बाहेर कर्जदारांच्या पैसे मागण्यासाठी रांगा लागायच्या

बॉलीवूडच्या चमक आणि ग्लॅमरमध्ये अनेकदा वैयक्तिक आणि आर्थिक संघर्षांचा समावेश असतो. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मेहनतीने स्टारडमच्या शिखरावर व्यवसायात पाऊल ठेवले होते, परंतु त्यानंतर त्यांना बऱ्याचशा नुकसानाला सामोरंही जावं लागलं. या काळात अमिताभ बच्चन यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. याबद्दल ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील त्या टप्प्याची आठवण करून दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक काळ असा होता जेव्हा अमिताभ यांच्या घराच्या बाहेर कर्जदारांच्या पैसे मागण्यासाठी रांगा लागायच्या एका मुलाखतीदरम्यान आशिष यांनी बिग बींनी त्या दिवसांत दाखवलेल्या संयमाबद्दल देखील सांगितले.

विद्यार्थी यांनी सांगितलेला अनुभव

विद्यार्थी म्हणाले, ‘मृत्यूदातामध्ये त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव मी कधीही विसरू शकत नाही. तो त्यांचा पुनरागमन चित्रपट होता’. बिग बींनी विद्यार्थीच्या आईला पत्र लिहिले तेव्हाचा एक किस्सा शेअर करताना ते म्हणाले, ‘माझे वडील खूप वृद्ध होते आणि आईला हृदयविकाराचा झटका आला होता. मी दररोज रात्री त्यांच्यासोबत राहण्यासाठी दिल्लीला जायचो आणि नंतर सकाळी विमानाने मुंबईला परतायचो. या काळात मी अमिताभजींना विनंती केली की ते माझ्या आईसाठी पत्र लिहू शकतील का? त्यांनी माझी विनंती मान्य केली आणि पत्र लिहिले. माझी आई त्यावेळी हृदयविकाराच्या झटक्याने बरी होत होती आणि व्हेंटिलेटरवर होती. मी त्यांना पत्र वाचून दाखवले.’ पण तेव्हा अमिताभ बच्चनही बऱ्याच अडचणींमध्ये होते. पण बच्चन यांनी सेटवर कधीही त्यांच्या वेदना जाणवू दिल्या नाहीत”

हिंमत न हारण्याचे अमितजी एक उत्तम उदाहरण 

विद्यार्थी पुढे म्हणाले, “त्यांच्याकडे पाहून कोणीही सांगू शकत नव्हते की ते इतक्या कठीण काळातून जात आहेत. मी त्यांच्यासोबत 1998 च्या ‘मेजर साब’ चित्रपटात पुन्हा काम केले. ते रात्रभर त्यांच्या भूमिकेत असायचे. ना ते दाढी- मिशी पण काढायचे नाहीत. आणि रात्रभर तशाच भुमिकेत असायचे. जर कोणी आयुष्यात कधी निराश झालं असेल आणि त्यातून बाहेर कसं यायचं हे जर जाणून घ्यायचं असेल तर अमितजी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे”

90 चे दशक सर्वात वेदनादायक होते

विद्यार्थी यांनी उल्लेख केलेला काळ बच्चन यांच्या आयुष्यातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक होता. 1990 च्या दशकाच्या मध्यात, त्यांची कंपनी अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड (ABCL) ला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. मनोरंजन जगात कॉर्पोरेट साम्राज्य निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्णपणे अपयशी ठरले आणि ते कर्जाच्या ओझ्याने दबले गेले. बच्चन यांनी स्वतः नंतर ते एका मुलाखतीत कबूलही केले. तेव्हा अमिताभ म्हणाले, ‘ त्यावेळी कोणीही मला चांगला आर्थिक सल्ला दिला नाही. आम्हाला काहीही होणार नाही याची खात्री देण्यात आली होती, म्हणून आम्ही कोणतीही चिंता न करता वैयक्तिक हमी देऊन कागदपत्रांवर स्वाक्षरी केली.’ त्यावेळी त्यांचा बंगला देखील धोक्यात होता, कर्जाच्या बदल्यात त्यांची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली होती. अमिताभ बच्चन यांनी एकदा तो काळ माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ म्हणून वर्णन केला होता.

त्या वाईट काळातही अमितजी कधीही कोणासमोरही रडले नाही

तरीही त्या काळात बच्चन पराभवाने नव्हे तर दृढनिश्चयाने मेहनत करत होते. विद्यार्थी यांनी याबद्दल सांगितले की, “लोक काम न मिळाल्याबद्दल आणि मागे राहिल्याबद्दल तक्रार करतात, परंतु त्यांनी खूप काही सहन केले आहे. एक काळ असा होता जेव्हा संपूर्ण देशावर त्यांचे वर्चस्व होते. कुलीच्या सेटवर जखमी झाल्यानंतर लोक अन्नही खात नव्हते. जेव्हा ते दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होते तेव्हाही त्यांनी त्या काळाचा धैर्याने सामना केला. ते कधीही कोणासमोरही रडले नाही. दिवाळखोरीच्या उंबरठ्यापासून ते पुन्हा एकदा भारतातील सर्वात यशस्वी अभिनेते आणि आदरणीय सेलिब्रिटींपैकी एक बनण्यापर्यंत, अमिताभ बच्चन यांचा प्रवास अकल्पनीय अडचणींना तोंड देत लवचिकता आणि टिकून राहण्याचे उदाहरण आहे.” असं म्हणत आशिष विद्यार्थी यांनी अमिताभ बच्चन यांचं कौतुक केलं.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.