अमिताभ बच्चन यांचा ‘तो’ चित्रपट ज्याने तोडले होते सर्व रेकॉर्ड; मिळाले होते तब्बल 40 अवॉर्ड्स
अमिताभ बच्चन यांचा असा चित्रपट ज्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड तोडले होते. एवढंच नाही तर या चित्रपटाला मिळाले होते तब्बल 40 अवॉर्ड्स. कोणता आहे हा चित्रपट माहितीये चला जाणून घेऊयात.

70 च्या दशकापासून अमिताभ बच्चन एकामागून एक ब्लॉकबस्टर चित्रपट देत आहेत. त्यांचे असे अनेक चित्रपट आहेत ज्यांनी अनेक अवॉर्ड जिंकले आहेत. या वयात देखील अमिताभ बच्चन पूर्ण एनर्जीने काम करतात.त्यांची भूमिका चोखपणे पार पाडतात. पण त्यांचा असा एक चित्रपट आहे जो बॉक्सऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला एवढंच नाही तर अमिताभ यांना तब्बल 40 अवॉर्ड मिळाले. या चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाने त्याच्या उत्कृष्ट कथेसाठी आणि एकूण कामगिरीसाठी 40 अवॉर्ड जिंकले होते.
बॉक्स ऑफिसवर इतका चालला होता की सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा होती.
हा चित्रपट आहे ‘पिकू’. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर इतका चालला होता की सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा होती. हा चित्रपट 2015 रोजी प्रदर्शित झाला होता. पण सुरुवातीला अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाला नकार दिला होता. या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत दीपिका पदुकोण देखील मुख्य भूमिकेत दिसली होती.
अमिताभ बच्चन यांनी का नाकारला हा चित्रपट
या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी अप्रतिम अभिनय केला होता. चित्रपटातील मुख्य पात्र म्हणजे अमिताभ बच्चन यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे असं दाखवण्यात आलं होतं. चित्रपटाच्या लेखिका जुही चतुर्वेदी यांनी सांगितले होतं की बिग बी म्हणाले होते की लोक काय विचार करतील. मी नेहमीच घाणेरड्या आणि विष्ठेबद्दल बोलताना दिसत राहिन. आणि म्हणून त्यांनी हा चित्रपट नाकारला होता. पण नंतर बिग बींना समजावून सांगण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी होकार दिला.
या अभिनेत्रीने देखील नाकारला होता हा चित्रपट
अनेक रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या आधी परिणीती चोप्राला या चित्रपटाची ऑफर मिळाली होती, परंतु तिने नकार दिला, त्यानंतर दीपिकाने हा चित्रपट केला.
दिवंगत अभिनेते इरफान खान यांना आदरांजली
या चित्रपटासाठी दिवंगत अभिनेते इरफान खान यांना मेलबर्न येथील आयफा 2015 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. इरफानने या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला होता.
- piku
या चित्रपटाला मिळाले 40 पुरस्कार
‘पिकू’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाने जवळपास 40 पुरस्कार जिंकले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. ‘पिकू’ ने गिल्ड अवॉर्ड्स, झी सिने, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, स्टारडस्ट अवॉर्ड्ससह 40 पुरस्कार जिंकले.
बॉक्स ऑफिस कलेक्शन
चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झालं तर, पिकूने भारतात 107 कोटी आणि जगभरात 141.30 कोटींची कमाई केली. ‘पिकू’च्या मजेदार कथेने सर्वांचं मन जिंकलं होतं.
हे सर्व पुरस्कार मिळाले
‘पिकू’ चित्रपटाचे दिग्दर्शन शुजित सरकार यांनी केले होते, ज्यांना यासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटाला समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट पटकथा, पार्श्वसंगीत पुरस्कार आणि अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला. अभिनेत्री दीपिका पदुकोणने या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर आणि आयफा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही जिंकला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संवाद आणि सर्वोत्कृष्ट कथेसाठी आयफा पुरस्कारही मिळाला.
