पहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांना धक्का बसला? पाळलं मौन, 8 दिवसांपासून करतायत फक्त ‘या’ गोष्टी
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला ८ दिवस उलटले आहेत. या ८ दिवसांत अनेक स्टार्सनी या घटनेचा निषेध केला आणि संताप व्यक्त केला. पण हल्ल्यापासून अमिताभ बच्चन यांनी मौन बाळगले आहे. तो ज्या पद्धतीने X ला प्रतिक्रिया देत आहे त्यावरून हे स्पष्ट होते की त्याला या घटनेचा खूप धक्का बसला आहे.

22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. या भ्याड हल्ल्यात 27 निष्पाप लोकांचा बळी गेला. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश संतप्त झाला आहे. सर्वत्र या भ्याड हल्ल्याचा निषेध केला जात आहे. हल्ल्यानंतर लोक सतत विविध माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. या हल्ल्यावर अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. परंतु नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असणारे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी मात्र तेव्हापासून मौन बाळगलं आहे.
फक्त नंबर लिहिलेली पोस्ट
हा दहशतवादी हल्ला गेल्या आठवड्यात मंगळवार 22 एप्रिल रोजी करण्यात आला. तेव्हापासून, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर अनेक पोस्ट केल्या आहेत, परंतु त्यांच्या सर्व पोस्टमध्ये फक्त पोस्ट नंबर लिहिलेला आहे, अमिताभ बच्चन यांनी काहीही वाक्य लिहिलेलं नाही किंवा कोणताही शब्द लिहिला नाही. ते केवळ एक नंबर लिहून पोस्ट करत आहेत. पहलगाम हल्ल्यावरच नाही तर त्यांनी इतर कोणत्याही मुद्द्यावर काहीही मत व्यक्त केलेलं नाही.
अमिताभ बच्चन यांना धक्का बसला?
अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते रोज एक्स वर अनेक पोस्ट शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वीच ते त्याच्या फॉलोअर्सबद्दल काळजीत असल्याचे दिसून आले होते. पण दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांना कदाचित मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. ते काहीच बोलत नाहीये. शब्दांशिवाय पोस्ट करत आहेत.
22 एप्रिलपासून बिग बींनी मौन बाळगले आहेत
हल्ल्यापूर्वी 22 एप्रिल रोजी रात्री उशिरा अमिताभ बच्चन यांनी X वर लिहिले होते, “T 5355 शांत X गुणसूत्र… मेंदू ठरवते.” (हे बिग बींचे 5355 वे ट्विट होते). त्याच दिवशी दुपारी पहलगाममध्ये हल्ला झाला आणि अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. तेव्हापासून लोक संतापलेले आहेत. आणि तेव्हापासून अमिताभ बच्चन यांनीही मौन बाळगलं आहे.
- Amitabh Bachchan silence tweets
अमिताभ बच्चन यांच्या पोस्टमध्ये एकही शब्द नाही
बिग बी यांनी 23 एप्रिल, 24 एप्रिल, 25 एप्रिल, 26 एप्रिल, 27 एप्रिल, 28 एप्रिल (दोन पोस्ट), 29 एप्रिल आणि 30 एप्रिल रोजी एक्स वर पोस्ट शेअर केल्या. पण त्यांनी या पोस्टमध्ये काहीही लिहिलेले नाही. अमिताभ बच्चन यांच्या या ट्विटवरून हे स्पष्ट होते की त्यांना या हल्ल्याचे खूप दुःख झाले आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे शब्द नाही आहेत.
