AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या रायबद्दल अभिषेक बच्चनला आजही सतावतेय भीती! लग्नाच्या 15 वर्षांनंतर अभिनेत्याचा मोठा खुलासा

ऐश्वर्या रायबद्दल अभिषेक बच्चनला आजही सतावतेय भीती! दोघांच्या नात्याचं मोठं सत्य अखेर समोर, लग्नाच्या 15 वर्षांनंतर अभिनेत्याचा मोठा खुलासा

ऐश्वर्या रायबद्दल अभिषेक बच्चनला आजही सतावतेय भीती! लग्नाच्या 15 वर्षांनंतर अभिनेत्याचा मोठा खुलासा
Aishwarya Bachchan
| Updated on: Apr 04, 2026 | 2:11 PM
Share

अभिनेता अभिषेक बच्चन याच्या अभिनयाचं सर्वच स्तरातून झालं. अनेक हीट सिनेमांमध्ये अभिषेक बच्चन याने काम केलं आहे. पण अभिनेत्याला त्याच्या प्रोफेशनल आयुष्यात कायमच मोठा संघर्ष करावा लागला. त्यामागे कारण देखील तसं होतं. महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांचा मुलगा असल्यामुळे कायम त्याच्यावर दबाव राहिला. एवढंच नाही तर, अनेकदा त्याची तुलना वडिलांसोबत देखील करण्यात आली. त्यानंतर अभिषेक याने ग्लोबल स्टार ऐश्वर्या हिच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर देखील दोघांमध्ये सतत तुलना करण्यात आली. आजही अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यात तुलना केली जाते. त्यामुळे अभिनेत्याच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत भीती वाटते का? असे प्रश्न देखील अभिषेक याला अनेकदा विचारले जतात. यावर खुद्द अभिनेत्याने मौन सोडलं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने होणाऱ्या तुलनेबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिषेक बच्चन म्हणाला, ‘लहानपणापासून सांगण्यात आलं आहे की, नात्यामध्ये सारखेपणा गरजेचा आहे… माझ्या आईची लोकप्रिता माझ्या वडिलांच्या लोतप्रियतेच्या तुलनेत फार मोठी होती. ही गोष्ट आमच्यासाठी सामान्य आहे… मला कायम रिलेशनशिपबद्दल समजवण्यात आलं आहे.’

पुढे अभिनेता म्हणाला , ‘ऐश्वर्या हिला मी माझ्या करियरच्या सुरुवातीपासून ओळखत होतो. माझ्या दुसऱ्या सिनेमात मी ऐश्वर्यासोबत काम केलं. तिच्यासोबत मी सर्वात जास्त काम केलं आहे. तेव्हा आम्ही चांगले मित्र होतो आणि आजही आहोत… जेव्हा आम्ही एकत्र होतो… साखरपुड्यापासून लग्नापर्यंत आमच्यात फक्त रिलेशनशिप राहिलं आहे… असं कधीच झालं नाही की, मी जेवण आणेल आणि तू घराची काळजी घे… यावर आमची कधी चर्चा देखील झाली नाही.’ असं देखील अभिनेता म्हणाला.

एवढंच नाही तर, लेक आराध्या हिच्याबद्दल देखील अभिषेक याने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘माझ्या घरात, आई – वडील म्हणून आम्ही दोघे आराध्या हिला चांगलं आणि वाईट सांगण्याऐवजी, ती सर्वात उत्तम उदाहरण कशी होऊ शकते याबद्दल सांगत असतो… असं कधीच नाही झालं की, मी तिला सेल्फ डिफेन्स शिकवेल. कारण माझी पत्नी ऐश्वर्या स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकते.’ असं देखील अभिनेता म्हणाला.

ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, 2007 मध्ये कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केलं. त्यानंतर 2011 मध्ये लेक आराध्या हिचं जगात स्वागत केलं आणि आज तिघे एकमेकांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत.

Follow Us
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.
वांद्र्यातील अनधिकृत बांधकाम कारवाईवर काँग्रेस नेता संतापला, त्या...
वांद्र्यातील अनधिकृत बांधकाम कारवाईवर काँग्रेस नेता संतापला, त्या....
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी धडाकाच लावलाय, मदरशांबाबत घेतला मोठा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी धडाकाच लावलाय, मदरशांबाबत घेतला मोठा.
मोटेगावकराने फोडलेल्या पेपरचा उघडपणे घेतला सराव, त्यानंतर व्हिडिओ...
मोटेगावकराने फोडलेल्या पेपरचा उघडपणे घेतला सराव, त्यानंतर व्हिडिओ....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत धनंजय मुंडे...
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत धनंजय मुंडे....
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा....