AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया बच्चन यांच्या उंचीची केली मस्करी; म्हणाले “त्यांना मान वर करून..”

अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन या दोघांमधील उंचीचा फरकाचा विषय नुकताच 'केबीसी'मध्ये चर्चेत आला. हॉटसीटवर बसलेल्या एका स्पर्धकाने त्याच्या उंचीविषयी नाराजी व्यक्त केली, तेव्हा बिग बींनी जया बच्चना यांच्या उंचीविषयी प्रतिक्रिया दिली. ते काय म्हणाले पाहुयात..

अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया बच्चन यांच्या उंचीची केली मस्करी; म्हणाले त्यांना मान वर करून..
Amitabh Bachchan and Jaya BachchanImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 30, 2023 | 10:40 AM
Share

मुंबई : 30 नोव्हेंबर 2023 | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांच्या उंचीत बराच फरक आहे. या दोघांच्या उंचीतील फरकावरून अनेकदा अनेकदा नेटकऱ्यांकडून टिप्पणी करण्यात आली. आता पहिल्यांदा स्वत: बिग बी त्यांच्या पत्नीच्या उंचीबद्दल बोलताना दिसले. ‘कौन बनेगा करोडपती’चा पंधरावा सिझन सध्या सुरू आहे. या सिझनमध्ये नुकताच लहान मुलांसाठी विशेष आठवडा प्रसारित करण्यात आला. ‘कौन बनेगा करोडपती ज्युनियर’च्या विशेष एपिसोडमध्ये बिग बी हे जया बच्चन यांच्या उंचीविषयी बोलताना दिसले. यावेळी हॉटसीटवर 14 वर्षांचा मयांक हा स्पर्धक बसला होता. मयांकने ‘कौन बनेगा करोडपती 15’मध्ये एक कोटी रुपये जिंकले आहेत. या मुलाच्या ज्ञानाचं बिग बींकडूनही खूप कौतुक झालं. मात्र उंचीमुळे आपल्याला सतत लोक चिडवत असल्याची तक्रार त्याने अमिताभ बच्चन यांच्यासमोर बोलून दाखवली.

शोदरम्यान हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकांसोबत बिग बींच्या चांगल्याच गप्पा रंगतात. ज्युनियर स्पेशल एपिसोडमध्ये मयांकसोबत बिग बी अशाच प्रकारे गप्पा मारत होते. मयांक आठवीत असून त्याचे वडील पोलिसांत हेड कॉन्स्टेबल आहेत. मयांक त्याच्या उंचीविषयी बिग बींना सांगतो, “सर्वजण माझ्या उंचीची खिल्ली उडवतात. मी जेव्हा उभा राहतो, तेव्हा माझ्यासमोर एखादा उंच मुलगा उभा राहतो. त्याच्यामुळे समोरच्याला मी दिसतच नाही.” मयांकची ही तक्रार ऐकून बिग बी त्याला म्हणतात, “माझ्यासोबतही असंच काहीसं होतं.” त्यावर मयांक त्यांना विचारतो, “तुम्ही तर उंच आहात.” तेव्हा बिग बी पत्नी जया बच्चन यांच्या उंचीचा उल्लेख करतात. “माझ्यासोबत उलट घडतं. माझी पत्नी तुझ्या उंचीची आहे आणि त्यांनासुद्धा मान वर करून मला पहावं लागतं.” हे ऐकताच मयांकसोबत उपस्थित प्रेक्षक हसू लागतात.

अमिताभ आणि जया यांची प्रेमकहाणी जगजाहीर आहे. 1973 मध्ये या दोघांनी लग्न केलं. त्यांना अभिषेक आणि श्वेता ही दोन मुलं आहेत. बिग बी आणि जया यांच्यातील उंचीचा हा विषय काही नवीन नाही. जेव्हा कधी एखादी कमी उंचीची मुलगी आणि उंच मुलाची जोडी पाहिली जाते, तेव्हा त्यांची तुलना अमिताभ-जया यांच्याशीच केली जाते. अमिताभ बच्चन यांची उंची 6’1 फूट आहे तर जया बच्चन यांची उंची 5’2 फूट इतकी आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.