पत्नी जयासोबत अमिताभ बच्चन यांचे कधीही न पाहिलेले फोटो; चौथा पाहून तुम्हीही हसाल!

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. नुकताच या दोघांनी लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त त्यांचे काही असे फोटो पाहुयात, जे चाहत्यांना क्वचित पहायला मिळाले असतील.

| Updated on: Oct 24, 2023 | 10:51 AM
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी नुकताच लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त मुलगी श्वेता बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन यांनी सोशल मीडियावर काही जुने फोटो पोस्ट केले आहेत. अमिताभ आणि जया यांचे हे फोटो तुम्ही आजवर कदाचित पाहिले नसतील.

1 / 5
अमिताभ आणि जया यांनी 1973 मध्ये लग्न केलं. ‘गुड्डी’ या चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन आणि जया यांची भेट झाली होती. या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

2 / 5
'जंजीर' या चित्रपटाच्या यशानंतर सर्व मित्र सेलिब्रेशनसाठी लंडनला जाण्याची तयारी करत होते. जयादेखील त्यांच्यासोबत लंडनला जाणार होत्या. मात्र अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या अटीमुळे दोघांनाही त्याच दिवशी लग्न करावं लागलं.

3 / 5
लंडनला जाणाऱ्या मित्रपरिवारात जयादेखील आहेत, हे जेव्हा हरिवंशराय बच्चन यांना समजलं तेव्हा ते म्हणाले की, जया आणि अमिताभ यांना लंडनला एकत्र जायचं असेल तर दोघांनाही आधी लग्न करावं लागेल. याच कारणास्तव दोघांनी लंडनला जाण्यापूर्वी 3 जून 1973 रोजी छोटेखानी सोहळ्यात लग्न केलं.

4 / 5
बिग बी आणि जया बच्चन यांनी ‘बंसी बिरजू’, ‘एक नजर’, ‘जंजीर’, ‘अभिमान’, ‘मिली’, ‘चुपके-चुपके’, ‘शोले’, ‘सिलसिला’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ अशा अनेक उत्तम चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

बिग बी आणि जया बच्चन यांनी ‘बंसी बिरजू’, ‘एक नजर’, ‘जंजीर’, ‘अभिमान’, ‘मिली’, ‘चुपके-चुपके’, ‘शोले’, ‘सिलसिला’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ अशा अनेक उत्तम चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

5 / 5
Follow us
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.