मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चन यांनी स्वत: ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी (Corona Test) पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करुन घ्या, असं आवाहन बच्चन यांनी केलंय. यापूर्वी जुलै 2020 मध्ये अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांना कोरोनाची लागण झाली होती. बच्चन पिता-पुत्रांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली होती. महत्वाची बाब म्हणजे त्यावेळी जया बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन आणि ऐश्वर्या आणि अभिषेकच्या मुलीची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली होती.