AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : मला अमिताभ बच्चन म्हटलं, पण माझं शरीर अमजद खानसारखं; फडणवीस असं का म्हणाले?

आपल्याला मुंबईकरांचा खटला जनतेच्या न्यायालयात लढायचा आहे. जनतेच्या मनातून फायनल जजमेंट येईल, याचा मला विश्वास आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis : मला अमिताभ बच्चन म्हटलं, पण माझं शरीर अमजद खानसारखं; फडणवीस असं का म्हणाले?
मुंबईतल्या भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेवर टीका करताना देवेंद्र फडणवीसImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 2:43 PM

मुंबई : भाजपा एक टीम आहे. माझा उल्लेख झाला, मला अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हटले. माझे शरीर अमजद खानसारखे आहे. पण हे मला अमिताभ बच्चन म्हणत आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. मुंबईतील भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मागून कितने आदमी थे, असा आवाज आला, त्यावर ते म्हणाले, हे विचारू शकतो. कितने आदमी थे. 65 मे से 50 निकल गये. और सबकुछ बदल गया. अभी दोही बचे है, असा टोला त्यांनी शिवसेनेला (Shivsena) लगावला. ते म्हणाले, दोनच राहिले पण त्यांचाही सन्मान आहे. आम्ही विरोधकांना सन्मान देतो. मला जो सन्मान मिळाला तो भाजपाच्या कार्यकर्त्यांमुळे. तुम्ही मेहनत केली. तुम्ही मला नेता बनवले. त्या यशाचा मान मला मिळाला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘किमान डायलॉग तरी चेंज करावा’

भाजपा मुंबई कार्यकर्ता मेळावा आणि नवनियुक्त अध्यक्ष आशिष शेलार तसेच नूतन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात त्यांनी मुंबई महापालिकेच्या निमित्ताने शिवसेनेला लक्ष्य केले. ते म्हणाले, की निवडणूक जवळ आल्यावर भावनिक मुद्दे सुरू होतील. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र, असा आरोप होईल. त्यांना माहीत आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडले जाणार नाही. कारण संविधान आहे. पण मुद्दाम भ्रम तयार केला जात आहे. त्यांनी किमान डायलॉग तरी चेंज करावा, असा टोला शिवसेनेला लगावला.

‘बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे’

मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढावे लागेल. काही लोकांना महाराष्ट्र गेल्याचे दु:ख नाही. त्यांना मुंबई महापालिकेचे दुख आहे. बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण करायची जबाबदारी आपली आहे. काही लोक आत्ममग्न होते. त्यांनी आम मुंबईकरांकडे लक्ष दिले नाही. बाळासाहेबांचे नाव घेऊन निवडून आलेल्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे आपल्याला मेहनत करून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, असे टोले त्यांनी शिवसेनेला लगावले.

हे सुद्धा वाचा

फडणवीसांची शिवसेनेवर टीका

‘आपल्याला मार्केटिंग करायचे नाही, पण…’

आपल्याला मुंबईकरांचा खटला जनतेच्या न्यायालयात लढायचा आहे. जनतेच्या मनातून फायनल जजमेंट येईल, याचा मला विश्वास आहे. रखडलेला विकास पूर्ण करणार आहोत. सामान्य माणसाचे स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत. धारावीतील अडथळे तीन महिन्यात दूर करू, असे म्हणत आपल्याला मार्केटिंग करायचे नाही. पण ज्याच्यासाठी काम करत आहोत, त्याच्यापर्यंत ते पोहोचवायचे आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘माझे शरीर अमजद खानसारखे’

.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं
.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं.
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ.
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली.
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान.
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक.
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत.
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप.
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी.
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य.