
बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. एक काळ असा होता जेव्हा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अभिनेत्री जया बच्चन यांना कळल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी कुटुंबाला प्राधान्य देत रेखा यांच्यावर असलेल्या प्रेमाचा त्याग केला. एवढंच नाही तर, रेखा यांच्यापासून दूर राहण्यास जया यांनी बिग बींना सांगितलं.
असं देखील सांगितलं जातं की, सुरुवातील अमिताभ बच्चन यांना रेखा यांचा प्रचंड राग यायचा… एका मुलाखतीनुसार, सिनेमाच्या शुटिंगसाठी अमिताभ बच्चन सकाळी 9 वाजता तयार रहायचे. सकाळी 7 वाजता बिग बी सेटवर पोहोचायचे आणि 9 वाजेपर्यंत शुटिंगसाठी तयार राहायचे. पण रेखा कधीच वेळेत यायच्या नाहीत. त्यांना कायम सेटवर येण्यासाठी उशीर व्हायचा…
रेखा शुटिंग सोडून कोलकाता येथे शॉपिंग करण्यासाठी जायच्या आणि लवकर यायच्या नाहीत. एवढंच नाही तर, रेखा त्यांचे डायलॉग्स देखील विसरायच्या. तर बिग बी त्यांचे डायलॉग्स लक्षात ठेवून तयार असायचे. याबद्दल अमिताभ बच्चन यांनी दिग्दर्शकांकडे याबद्दल तक्रार देखील केली होती. पण दिग्दर्शक बिग बींना म्हणाले आता ही रेखा यांची सवय झाली आहे…
रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम देखील केलं आहे. रेखा यांनी बिग बींवर असलेल्या प्रेमाचा अनेकदा स्वीकार देखील केला. पण अमिताभ बच्चन यांनी कायम खासगी आयुष्यावर मौन बाळगलं. तर दुसरीकडे, रेखा यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकांना माहिती आहे. रेखा यांच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झाली. पण त्यांचं लग्न देखील झालं. पण ते फार काळ टिकलं नाही. रेखा याच्या पतीने लग्नाच्या सहा महिन्यांनंतर स्वतःचं आयुष्य संपवलं.
अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, बिग बी लवकरच ‘सेक्शन 84’, ‘आंखे – 2’, ‘द इन्टर्न’ आणि ‘ब्रह्मास्त्र 2’ सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. अमिताभ बच्चन आता 83 वर्षांचे आहेत. पण आजही मोठ्या पडद्यावर सक्रिय आहेत.