AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांतच्या मृत्यूने या लोकांचं सर्वकाही हिसकावून घेतलं… अमाल मलिकचं धक्कादायक वक्तव्य

Bigg Boss 19 Fame Amal Malik on Sushant Singh Rajput: 'बिग बॉस 19' फेम अमाल मलिकने समोर आणला बॉलिवूडचा खरा चेहरा, म्हणाला, 'सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूने या लोकांचं सर्वकाही हिसकावून घेतलं आणि...', सध्या सर्वत्र अमाल मलिक याच्या वक्तव्याची चर्चा...

सुशांतच्या मृत्यूने या लोकांचं सर्वकाही हिसकावून घेतलं... अमाल मलिकचं धक्कादायक वक्तव्य
फाईल फोटो
| Updated on: Oct 01, 2025 | 8:17 AM
Share

Bigg Boss 19 Fame Amal Malik on Sushant Singh Rajput: गायक आणि संगीतकार अमाल मलिक सध्या ‘बिग बॉस 19’ च्या घरात स्पर्धक म्हणून सक्रिय आहे. बिग बॉसच्या घरात असल्यामुळे अमाल कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. दरम्यान अमाल याने दिवंगत अभिनेता सिशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूबद्दल देखील मोठ वक्तव्य केलं होतं. सुशांत इंडस्ट्रीच्या वाईट पद्धतींना तोंड देऊ शकला नाही आणि तो हे जग सोडून गेला. अमाल म्हणाला, सुशांतला ज्याप्रमाणे वागणूक देण्यात आली होती, त्याचप्रमाणे आता मोठे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते कार्तिक आर्यनलाही तशीच वागणूक देत आहेत.

सध्या अमाल याने केलेलं वक्तव्य तुफान चर्चेत आलं आहे. एका मुलाखतीत अमाल मलिक याने मोठा खुलासा केला होता. अमाल मलिक म्हणालेला, ‘लोकांना आता इंडस्ट्रीचं सत्य कळलं आहे. बॉलिवूडची दुसरी बाजू इतकी काळी आहे की, ज्यमुळे लोकांना स्वतःचे प्राण गमवावे लागत आहेत. सुशांत सिंह राजपूत हे सर्वकाही सहन करू शकला नाही. या इंडस्ट्रीतील लोकांनी त्याला वाईट वागणूक दिली. बॉलिवूडकरांनी त्याचं मनोबल कमी केलं. हे बॉलिवूड आहे. जेव्हा सुशांतचा मृत्यू झाला तेव्हा सामान्य माणूस म्हणाला, “या लोकांना सोडून द्या, ते घाणेरडे आहेत.’

कार्तिक आर्यन याच्याबद्दल व्यक्त केली चिंता…

अमाल म्हणाला, ‘सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडची पोलखोल झाली आहे. मोठट-मोठ्या लोकांना मोठा झटका लागला आहे. चांगल्या व्यक्तीसोबत वाईट झालं आणि तसंच आता कार्तिक आर्यन याच्यासोबत देखील होत आहे. असं असताना देखील तो मुलगा डान्स करक, हसत आयुष्यात पुढे जात आहेत. कार्तिक आर्यन देखील आउटसाईडर आहे. इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते आणि निर्माते देखील खेळ खळेत असतात.’

सांगायचं झालं तर, सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर फक्त चाहत्यांना नाही तर, बॉलिवूडकरांना देखील मोठा फटका बसला… अभिनेत्याच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींची चौकशी देखील करण्यात आली. 14 जून 2020 मध्ये अभिनेत्याने मुंबई येथील राहत्या घरी स्वतःचं आयुष्य संपवलं. सुशांत याच्या निधनाला अनेक वर्ष झाली आहेत. पण आजही चाहते अभिनेत्याला विसरू शकलेले नाहीत.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.