Bigg Boss 19 फेम अभिषेकचे अनेक महिलांसोबत प्रेमसंबंध, पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप
Bigg Boss 19: 'बिग बॉस 19' फेम अभिषेक बजाज याने अनेक महिलांसोबत प्रेमसंबंध असल्याचा दावा अभिनेत्याची पूर्व पत्नी आकांक्षा हिने केला आहे. अभिषेक याने 'बिग बॉस 19' च्या घरात प्रवेश केल्यानंतर अभिषेक याच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत...

‘बिग बॉस 19’ स्पर्धक अभिषेक बजाजची पूर्व पत्नी आकांक्षा जिंदालने अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. अभिषेक आणि आकांक्षाचं 2017 मध्ये लग्न झालं. पण दोघांचं लग्न फार काळ काही टिकलं नाही. लग्नाच्या 2 वर्षांनंतर म्हणजे 2029 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सांगायचं झालं तर, अभिषेक आणि आकांक्षा यांनी त्याचं लग्न आणि घटस्फोट गुपित ठेवलं होतं. पण जेव्हा अभिषेक याने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला तेव्हा त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. तेव्हा लोकांना कळलं की अभिषेक याचं लग्न आणि घटस्फोट झालेला आहे.
दरम्ययान, आकांक्षा जिंदालने तिच्या तुटलेल्या लग्नाबद्दल आणि घटस्फोटाबद्दल मौन सोडलं आहे. आकांक्षा हिने अभिषेक बजाजने तिची फसवणूक केली आणि अनेक महिलांशी विवाहबाह्य संबंध ठेवले असा दावा केला आहे. तिने अभिषेक बजाजच्या वर्तनाबद्दलही मोठा खुलासा केला आहे. अनेक महिलांसोबत रंगेहात पकडलं…
एका मुलाखतीत आकांक्षा हिने खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. आकांक्षाने सांगितलं की लग्नानंतर काही काळातच अभिषेकने तिला फसवल्याचे पुरावे शोधून काढल्यानंतर त्यांच्यात भांडणं सुरू झाली. आकांक्षाने आरोप केला की अभिषेकचे अनेक महिलांशी प्रेमसंबंध होते आणि तिने त्याला रंगेहाथ पकडलं देखील होतं.
आकांक्षा जिंदल आणि अभिषेक बजाज यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं, शाळेच्या दिवसांपासून दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. लग्नाआधी त्यांचं 8 वर्षांचं रिलेशनशिप देखील होतं. पण लग्नानंतर त्यांच्या नात्यात गंभीर समस्या निर्माण झाल्या. आकांक्षा सांगितल्यानुसार जेव्हा तिने स्क्रीनशॉट घेतले आणि अभिषेकला विचारलं तेव्हा त्याने स्वतःला पीडित म्हणून दाखवायला सुरुवात केली आणि त्याऐवजी तिला दोष देऊ लागला.
अभिषेक याला लगेच येतो राग…
फसवणुकीचे आरोप करत आकांक्षा असं देखील म्हणाली की, अभिषेक याला लवकर राग येतो. त्याचं वर्तन प्रभावी होतं. जेव्हा आकांक्षाला विचारलं गेलं की, ती फॅमिली वीकमध्ये बिग बॉस 19 मध्ये प्रवेश करेल की वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून, तेव्हा तिने सांगितलं की, तिला याबद्दल अद्याप खात्री नाही. तिनं असंही म्हटलं की, जर तिला एखाद्याची पूर्व पत्नी असण्यापेक्षा तिच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या आधारे शोमध्ये बोलावलं तर ती नक्कीच जाईल.
