वेडगळपणा… अमिताभ यांच्यासमोर अचानक चाहती साडी सोडायला लागली, ब्लॅकमेलिंग… बिग बींनी थेट उचलून घेतलं अन्….
सेलिब्रिटींना कधीकधी चाहत्यांबाबतचे फार विचित्र अनुभव येतात. असाच एक अनुभव सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना देखील आला होता. एक चाहतीने अमिताभ बच्चन यांना प्रपोज केलं होतं पण त्यांनी नकार देताच तिने जे काही केलं ते पाहून बिग बींना धक्काच बसला होता.

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे जगभरात करोडो चाहते आहेत. बिग बींनी 70, 80 च्या दशकापासूनच चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. आजही अमिताभ यांची काम करण्याची एनर्जी आणि आवड चाहत्यांना अवाक करते. आजही चाहते अमिताभ यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गर्दी करतात. अमिताभ यांनी अनेक मुलाखतींमध्ये त्यांना चाहत्यांच्याबाबत आलेल्या अनुभवांबद्दल सांगितलं आहे. त्यातीलच एक अनुभव जो त्यांच्यासाठी फारच धक्कादायक ठरला होता.
एक मुलगी बराच वेळापासून त्यांची वाट पाहत होती
हा किस्सा आहे 1975 चा. जेव्हा बिग बी आधीच सुपरस्टार होते. तेव्हा एका चाहतीने त्यांच्यासमोर जे केलं ते खरोखरंच धक्कादायक होतं. अमिताभ बच्चन शूटिंगसाठी बाहेर गेले होते, जेव्हा ते हॉटेलमधील त्यांच्या खोलीत परतले तेव्हा त्यांना दिसले की एक मुलगी बराच वेळापासून त्यांची वाट पाहत होती. सुरुवातीला अमिताभ बच्चन यांना थोडं आश्चर्य वाटलं नंतर त्यांनी प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न केला.
मुलीने अमिताभ यांना थेट ब्लॅकमेल करायला सुरुवात केली
अमिताभ बच्चन यांनी वारंवार विनंती करूनही, ही मुलगी तिथून निघण्यास तयार नव्हती. ती सतत एकच गोष्ट सांगत होती की ‘माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे.’ पण जेव्हा अमिताभ बच्चन यांनी या मुलीचे प्रपोजल नाकारलं तेव्हा तिने त्यांच्यासमोर थेट तिची साडी काढायला सुरुवात केली आणि त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. या मुलीने अमिताभ बच्चन यांना म्हटलं की, जर त्यांनी तिचं प्रपोजल मान्य केलं नाही तर ती आरडाओरड करून सर्वांना जमा करेल आणि त्यांच्यावर खोटा आरोप लावेल.
हा सगळा प्रकार पाहून अमिताभ बच्चन खूप घाबरले होते पण…
हा सगळा प्रकार पाहून अमिताभ बच्चन खूप घाबरले. पण नंतर त्यांनी हे प्रकरण शहाणपणाने आणि समजुतीने हाताळण्याचा निर्णय घेतला. अमिताभ यांना समजले की ही मुलगी मानसिकदृष्ट्या सध्या फार अस्थिर आहे. म्हणून त्यांनी तिच्याशी प्रेमाने बोलण्यास सुरुवात केली आणि एकत्र चहा पिण्याची ऑफर दिली.
बिग बींनी मुलीला थेट उचलून ….
बिग बींनी चहा मागवला आणि काही वेळ तिच्याशी बोलले देखील. नंतर जेव्हा वेटर चहा घेऊन खोलीत आला तेव्हा अमिताभ बच्चन यांनी या मुलीला थेट उचलून खोलीबाहेर नेलं. आणि सुरक्षा रक्षकांना सगळा प्रकार सांगितला. नंतर, हॉटेल कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी हे प्रकरण हाताळलं.
बॉलिवूड सुपरस्टार्ससोबत अशा अनेक घटना अनेकदा घडतात. कधीकधी चाहते सेलिब्रिटींच्या गाडीमागे त्यांचा पाठलाग करतात, तर कधीकधी कोणी सेलिब्रिटींच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान त्यावेळी सेलिब्रिटी तो प्रसंग कसा हाताळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरतं.
