AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई पोलिसांना ‘हीरामंडी’ सीरिजची भूरळ, पोस्ट पाहून अमृता खानविलकर म्हणाली, ‘उफ्फ ये अदाये!’

Amruta Khanvilkar | अमृता खानविलकर मुंबई पोलिसांना का म्हणतेय, 'उफ्फ ये अदाये!', मुंबई पोलिसांना 'हीरामंडी' सीरिजची पडलेली भूरळ पाहून तुम्हीही म्हणाल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा..., चर्चांना उधाण...

मुंबई पोलिसांना 'हीरामंडी' सीरिजची भूरळ, पोस्ट पाहून अमृता खानविलकर म्हणाली, 'उफ्फ ये अदाये!'
| Updated on: May 25, 2024 | 12:53 PM
Share

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत… कधी डान्स, तर कधी सिनेमांमुळे चर्चेत असणारी अमृता आता मात्र सोशल मीडियापोस्टमुळे चर्चेत आली आहे. अमृता हिने स्वतःच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मुंबई पोलिसांनी केलेली पोस्ट शेअर केली असून अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘उफ्फ ये अदा!’ असं लिहिलं आहे. अभिनेत्री इन्स्टाग्राम स्टोरी पाहिल्यानंतर तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, अमृताने असं का केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमृता हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, मुंबई पोलिसांनी एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टच्या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी पोलिसांनी ‘हीरामंडी’ वेब सीरिजमधील प्रसिद्ध झालेल्या डायलॉगची मदत घेतली आहे. ‘एक बार देख लिजिए, दिवाने बना दिजिए, चलान काटने के लिए तय्यार है हम, तोह हेल्मेट पेहेन लिजिए’ अशी पोस्ट मुंबई पोलिसांनी शेअर केली आहे.

मुंबई पोलिसांची पोस्ट पाहिल्यानंतर अमृताने देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर अभिनेत्रीने कॅफ्शनमध्ये, ‘मुंबई पोलीस गॉट नो चिल्ल उफ्फ ये अदाये’ असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र पोलिसांची पोस्ट आणि अमृताच्या कॅप्शनची चर्चा रंगली आहे.

अमृता खानविलकर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अमृता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. शिवाय अभिनेत्री स्वतःचे वर्कआऊटचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता अमृता लवकरच ‘पठ्ठे बापूराव’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

‘हीरामंडी’ वेब सीरिज…

बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक संजय लिला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ वेब सीरिजची सर्वत्र चर्चा रंगली आहे. लाहोर येथे असलेल्या हीरामंडी यावर सीरिजची कथा आधारलेली आहे. सीरिजमध्ये अभिनेत्री मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, संजीदा शेख, शर्मिन सेहगल यांनी मुख्य भूमिका साकारली आहे…

Follow Us
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?