AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिनच्या पत्नीचा स्टायलिश लूक, सारालाही टाकले मागे; अंजलीच्या काफ्तान लूकची तुफान चर्चा

सारा तेंडुलकर तिच्या लूकमुळे नेहमी चर्चेत असते आणि अनेकदा कार्यक्रमांमध्ये ती तिच्या आईसोबत म्हणजेच अंजली तेंडुलकर सोबत दिसते. अशातच एका कार्यक्रमात जेव्हा सारा आणि अंजली तेंडुलकर एकत्र दिसल्या तेव्हा मात्र लोकांच्या नजरा सारा न जाता अंजलीवर खिळल्या. अंजलीच्या या लूकची चर्चा सर्वत्र होऊ लागली

सचिनच्या पत्नीचा स्टायलिश लूक, सारालाही टाकले मागे; अंजलीच्या काफ्तान लूकची तुफान चर्चा
Anjali and SaraImage Credit source: Google
| Edited By: बापू गायकवाड | Updated on: May 09, 2026 | 9:12 PM
Share

सचिन तेंडुलकरची मुलगी, सारा तेंडुलकरने अजून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले नसले तरी, ती तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच ही माय लेकीची जोडी मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये आली होती, जिथे त्यांच्या दोघींच्या ब्लॅक आउटफिटच्या लूकची चर्चा सर्वत्र झाली आणि यात मात्र साराऐवजी अंजली तेंडुलकच्या लूकवर सर्वांच्या नजरा खिळल्या. आपल्या ग्लॅमरने अनेकदा स्टार किड्सना टक्कर देणारी सारा, एका शॉर्ट ड्रेसमध्ये तिच्या आईसमोर फिकी पडली.

साराची स्टाईल प्रभावी असली तरी, यावेळी तिची आई अंजलीच्या रॉयल काफ्तान लूकने त्याच्या मोहकतेमुळे आणि आरामदायकतेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर अंजलीने हा कफ्तान लूक अगदी आकर्षकपणे स्टाईल केला होता.

सारा तेंडुलकर मिनी ब्लॅक लूकमध्ये दिसली

सारा तेंडुलकरने मॉडर्न आणि चिक लूकचा उत्तम मिलाफ असलेल्या ब्लॅक कलर्सचा मिनी ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. तिच्या स्लीव्हलेस ड्रेसमध्ये वेस्टच्या जवळ रुश्ड डिटेलिंग होते, ज्यामुळे तिच्या या आउटफिटला एक स्टायलिश टच मिळाला होता. तिने लेयर्ड सोन्याचा नेकलेस, नाजूक कानातले आणि स्ट्रॅपी हील्स वेअर करून आपला लूक पूर्ण केला.

अंजलीचा तेंडुलकरचा लूक ठरला लक्षवेधी

साराचा लूक पूर्णपणे वेस्टर्न असला तरी, तिची आई अंजली तेंडुलकरने आपल्या पारंपरिक फॅशनने सर्वांची मने जिंकली. यावेळी अंजली तेंडुलकरने ब्लॅक कलर्सचा एम्ब्रॉयडर्ड केलेला कफ्तान ड्रेस परिधान केला होता. ज्यावर गोल्डन डिटेलिंग केलेली होती, तर कफ्तानला साईड कट्स होती, ज्यामुळे अंजलीच्या देसी लूकला एक मॉर्डन टच येत होता.

डिझायनर कफ्तानची किंमत किती?

नीता गुप्ता यांची मुलगी आणि फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता यांनी हा ड्रेस डिझाइन केला आहे. हा ड्रेस ‘हाऊस ऑफ मसाबा’चा असून त्याची किंमत अंदाजे 30,000 रुपये असल्याचे म्हटले जाते. अंजलीने तिच्या लूकमध्ये लक्झरी ॲक्सेसरीजची भर घातली. तिने मेसन व्हॅलेंटिनोचे रॉकस्टड स्लाईड सँडल्स घातले होते, तिने अंदाजे २.४ लाख रुपये किमतीची बल्गारी दिवाजची ड्रीम व्हॅनेटी बॅगही सोबत घेतली होती, ज्यामुळे तिच्या लूकमध्ये हाय-फॅशनचा एलिमेंट जोडला गेला.

हलका न्यूड-टोन मेकअप, मोकळे केस, एक नाजूक सोन्याची लेयर्ड चेन, स्ट‍ड इअररिंग्स आणि डिजिटल घड्याळ घालून तिने आपला लूक पूर्ण केला होता. चाहते सोशल मीडियावर या स्टायलिश माय-लेकीच्या जोडीचे कौतुक करत आहेत.

Follow Us
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर..
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर यांनीही घेतले दर्शन
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद...
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद, नेमकं प्रकरण काय?
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी,
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, नेमकं...
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?