AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपल्या घटस्फोटाची केस..; अंकिता लोखंडेकडून विकी जैनला धमकी, नेमकं काय घडलं?

बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यातील भांडणं ही काही नवीन गोष्ट नाही. पण हे भांडण आता घटस्फोटाच्या धमकीपर्यंत पोहोचलं आहे. बिग बॉसच्या घरात नुकत्याच झालेल्या एका टास्कदरम्यान अंकिता आणि विकीचं पुन्हा एकदा वाजलं. यावेळी अंकिता जे म्हणाली ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

आपल्या घटस्फोटाची केस..; अंकिता लोखंडेकडून विकी जैनला धमकी, नेमकं काय घडलं?
Ankita Lokhande and Vicky Jain Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 01, 2024 | 8:13 AM
Share

मुंबई : 1 जानेवारी, 2024 | सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला ‘बिग बॉस 17’ हा शो सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. यंदाचा सिझन पहिल्या एपिसोडपासूनच प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. नेहमीच्या स्पर्धकांसोबतच या सिझनमध्ये दोन विवाहित जोड्या स्पर्धक म्हणून दाखल झाल्या. त्यामुळे पती-पत्नीमधील भांडणंसुद्धा बिग बॉसच्या शोमध्ये पहायला मिळत आहेत. इतकंच नव्हे तर बिग बॉसमध्ये पती-पत्नीच्या नात्यात फूट पडेल की काय, असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन या जोडीने विशेष लक्ष वेधलं आहे. या जोडीचं सोशल मीडियावर एक रुप आणि बिग बॉसच्या घरात दुसरं रुप पाहून सर्वजण अवाक् झाले आहेत. दररोज अंकिता-विकीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे भांडणं होताना दिसतात. आता या शोमध्ये ज्याची भीती अंकिताच्या चाहत्यांना होती, अखेर तेच घडलं. तिने विकीला थेट घटस्फोटाची धमकी दिली आहे.

‘बिग बॉस’च्या घरात कोर्टाचा सेट बनवण्यात आला होता. यामध्ये मुनव्वर फारुकी आणि अंकिता लोखंडे या दोघांना वकील बनवण्यात आलं होतं. तर विकी जैन त्यांच्या विरोधात होता. या टास्कदरम्यान बिग बॉसने विकीला सांगितलं की सुनावणी सुरू होण्यापूर्वी तू आधी फी बद्दल चर्चा करून घे. बिग बॉसने अंकितालाही सांगितलं होतं की मुनव्वरकडून फी बद्दल चर्चा करून घे. त्यानंतर विकी अंकितावर भडकतो आणि फी बद्दल स्वत:च चर्चा करून घेतो, असं सुनावतो. त्यावर भडकून अंकिताही म्हणते, “नाही बिग बॉस, मी स्वत:सुद्धा करू शकते.”

हे सर्व घडल्यानंतर विकी सतत अंकिताला फी वरून डिवचताना पहायला मिळतो. अखेर अंकिता विकीच्या या वागणुकीला वैतागते आणि म्हणते, “तू माझ्यासोबत हे सर्व करू नकोस. नाहीतर इथेच आपल्या घटस्फोटाची केस सुरू होईल.” अंकिताच्या तोंडून हे शब्द ऐकल्यानंतर घरातील इतर स्पर्धकांना आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा मन्नारा म्हणते, “तू जास्त बोलतेय.” कोर्टाच्या टास्कदरम्यान विकी जैन सतत त्याचं बोलणं मांडण्याचा प्रयत्न करत होता आणि आयेशा खानला मॉक ट्रायल करत होता. यासोबतच तो मुनव्वरविरोधातही सतत मुद्दे उपस्थित करत होते. विकीचे मुद्दे ऐकून मुनव्वर आणि अंकिता नाराज होतात.

काही दिवसांपूर्वीच अंकिता आणि विकी हे सोशल मीडियावर एका व्हिडीओमुळे चर्चेत आले होते. विकीने अंकितावर हात उचलण्याचा प्रयत्न केला, असा आरोप नेटकऱ्यांनी तो व्हिडीओ पाहिल्यानंतर केला होता.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.