AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आम्हाला आमचं आयुष्य जगू द्या…’, घटस्फोटावरून ट्रोल करणाऱ्यांवर भडकली अंकिता लोखंडे

Ankita Lokhande : 'बिग बॉस 17' मध्ये विषय घटस्फोटापर्यंत पोहोचला होता, शो संपताच अंकिता लोखंडे - विकी जैन यांच्यात वाढलं प्रेम, ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता लोखंडे हिच्या वक्तव्याची चर्चा

'आम्हाला आमचं आयुष्य जगू द्या...', घटस्फोटावरून ट्रोल करणाऱ्यांवर भडकली अंकिता लोखंडे
विशेष म्हणजे अंकिता लोखंडे हिने हे फोटोशूट क्राॅप टाॅपवर केले आहे. आता अंकिता लोखंडेचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
| Updated on: Feb 11, 2024 | 1:40 PM
Share

मुंबई : 11 फेब्रुवारी 2024 | ‘बिग बॉस 17’ मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि पकी विकी जैन यांनी एकत्र एन्ट्री केली होती. शोमध्ये अंकिता – विकी यांच्यात अनेक कारणांमुळे वाद झाले. अंकिता – विकी यांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं होतं. ज्यामुळे सोशल मीडियावर दोघांना ट्रोल करण्यात आलं होतं. आता अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता लोखंडे हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अंकिता हिने विकी याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

अंकिता म्हणाली, ‘मी जेव्हा बाहेर आली तेव्हा मीडिया होती. अनेक प्रश्न होते आणि माझ्यावर एकाप्रकारचा दबाव होता. तुमच्यावर कोणी दबाव टाकू शकत नाही. पण कधी-कधी काही गोष्टींचा दबाव वाटतो. लोकं आमच्या नात्याला जज करत होते. आम्हाला माहिती आमच्यात काय नातं आहे आणि त्याचा सांभाळ कसा करायला हवा. बिग बॉसमध्ये मी किंवा विकी जे काही बोललो त्याच्या आधारावर आमचं नाही…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘बिग बॉसच्या घरात आमच्यात भांडणं सुरु झाली आणि त्यात घरात संपली. मी कोणत्या स्पर्धेत नाही. मी आदर्श नाही, पण मला माझं नातं फार चांगल्या प्रकारे माहिती आहे. कपल आपापल्या घरात भांडतात, पण कोणाला ते दिसत नाही. आम्हाला देखील माहित नव्हते की आम्ही इतकं भांडू. कारण आम्हाला कधीच कोणतीही अडचण आली नाही. आमची भांडणं तिथेच सुरू झाली आणि तिथेच संपली.’

‘माझ्या आणि विकीच्या नात्यावर कोणीही काहीही बोलू नका. तुम्ही तुमचं आयुष्य जगा आणि आम्हाला आमचं आयुष्य जगू द्या.’ असं देखील अंकिता लोखंडे नुकताच झालेल्या एका मुलाखतीत म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता लोखंडे हिची चर्चा रंगली आहे.

अंकिता लोखंडे हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अंकिता हिच्या आयुष्यात विकी जैन याची एन्ट्री झाली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

अंकिता लोखंडे लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेमुळे अंकिता हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील अंकिता हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.