AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ankita Lokhande | ‘तीन महिने दिवस रात्र फक्त…’, अंकिता लोखंडे हिच्या आयुष्यातील मोठं सत्य समोर

Ankita Lokhande | अंकिता लोखंडे हिच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य अखेर समोर; अभिनेत्री म्हणाली, 'तीन महिने दिवस रात्र फक्त...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता हिचीच चर्चा

Ankita Lokhande | 'तीन महिने दिवस रात्र फक्त...', अंकिता लोखंडे हिच्या आयुष्यातील मोठं सत्य समोर
| Updated on: Sep 06, 2023 | 10:26 AM
Share

मुंबई : 6 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री अंकिता लोखंडे टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अंकिता हिने अनेक सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. पण ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे अंकिता हिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. आजही अनेक चाहते अभिनेत्रीला अंकिता लोखंडे नाही तर, अर्चना याच नावाने ओळखतात. कारण ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत अभिनेत्रीने अर्चना ही भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही मालिकेतील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने आयुष्यातील अनेक गोष्टींची खुलासा केला आहे.

अंकिता म्हणाली, ‘परित्र रिश्ता मालिकेसाठी इतकं काम केलं, जेवढं कोणत्याही गोष्टीसाठी केलं नाही. मझ्या लक्षात आहे की मी तीन महिने घरी गेली नव्हती. कुटुंबापासून दूर होती. तीन महिने दिवस – रात्र फक्त आणि फक्त शुटिंग सुरु होतं. सेटवर एक पुरुषांसाठी शौचालय होतं, जे मला देण्यात आलं होतं. मी तेथे तयार व्हायची आणि शुटिंगसाठी सज्ज असायची..’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘अस्मिता मेरे म्हणून माझी हेअरड्रेसर होती, जी कपडे इस्त्री करण्यासाठी माझी मदत करायची. सगल १४८ तास त्यांनी शुटिंग केलं होतं…तो काळ माझ्या आयुष्यातील सर्वात खास आणि कधीही न विसरता येणारा काळ होता…’ असं देखील म्हणत अंकिता हिने जुन्या आठवणी ताज्या केल्या…

‘मुंबईत आल्यानंतर आम्ही चार मुली एका अपार्टमेंट राहायचो. आम्हाला फक्त करियरमध्ये पुढे जायचं होतं. मालिकेत माझ्यासोबत श्रद्धा आर्य ही एक स्पर्धक होती आणि आम्ही आमच्या करिअरमध्ये खूप चांगले काम करत आहोत म्हणून आनंदी होतो. तो प्रवास पूर्णपणे वेगळा होता कारण आम्हाला सर्वांना काहीच माहीत नव्हते. ‘

‘मालिकेतून आम्ही अनेक नव्या गोष्टी शिकलो. अभिनयाचे धडे गिरवले, फॅशन सेन्सबद्दल अनेक गोष्टी कळल्या.. किशोर नमित कपूर सरांकडून आम्ही अभिनय शिकलो. त्या सर्व आठवणी मी कायम जपून ठेवणार आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

सध्या अंकिता ‘पवित्र रिश्ता’ मालिकेमुळे चर्चेत आली आहे. पण मालिकेत अंकिता आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्यामध्ये प्रेम बहरलं होतं. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं होतं. दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. पण अर्चना आणि सुशांत यांचं नात फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.