AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझ्या डोक्यावर केस का हवेत?’ टीएमसी पराभवानंतर अनुपम खेर यांचा भाजप नेत्याला टोला

पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या नंतर राजकीय वातावरण तापले असतानाच आता एका नेत्याच्या विधानामुळे अनुपम खेर चर्चेत आले आहेत. काय आहे नेमकं कारण?

'माझ्या डोक्यावर केस का हवेत?' टीएमसी पराभवानंतर अनुपम खेर यांचा भाजप नेत्याला टोला
| Updated on: May 05, 2026 | 6:20 PM
Share

पश्चिम बंगालमधील निवडणुकीदरम्यान राजकीय वातावरण तापले असतानाच एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर हास्याचा माहोल निर्माण झाला आहे. भाजप नेते समिक भट्टाचार्य यांनी केलेल्या विधानामुळे अभिनेते अनुपम खेर देखील चर्चेत आले आहेत.

निवडणूक प्रचारादरम्यान समिक भट्टाचार्य यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका करताना अतिशयोक्तीपूर्ण वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, आकाश जमिनीवर येऊ शकते, समुद्र आकाशावर चढू शकतो, अगदी अनुपम खेर यांच्या डोक्यावर केसही उगवू शकतात. पण तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणे अशक्य आहे. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या.

अनुपम खेर यांची मजेदार प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ अनुपम खेर यांच्या नजरेस पडताच त्यांनीही विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिली. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, अरे भाऊ, मी तुमचं काय बिघडलं आहे? माझ्या केसांना मध्ये का आणता? माझ्या सध्याच्या अवस्थेत मी तर शंभर जन्मातही केस उगवावेत अशी प्रार्थना करणार नाही. जय श्री राम असं त्यांनी म्हटलं.

त्यांनी या पोस्टसोबत हसणाऱ्या इमोजींचाही वापर केला, ज्यामुळे त्यांचा हलकाफुलका अंदाज चाहत्यांना अधिकच भावला. या घटनेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरशः पाऊस पडू लागला. काही युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया देत अनुपम सरांना का ओढलं? असा प्रश्न विचारला, तर काहींनी AI च्या मदतीने अनुपम खेर केसांसह कसे दिसतील? असे फोटो तयार करण्यास सुरुवात केली.

राजकारणातून मनोरंजनापर्यंत

निवडणूक निकालांमुळे सुरू झालेली चर्चा एका वक्तव्यामुळे थेट मनोरंजनाच्या पातळीवर पोहोचली. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे विधान अधिकच गाजले.

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनुपम खेर यांचा ‘तन्वी द ग्रेट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याचे दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. तसेच ‘खोसला का घोसला 2’ आणि ‘फ्लिकर’ हे त्यांचे आगामी प्रोजेक्ट्स लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Follow Us
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष अधिवेशन, नेमकी कसली चर्चा?
कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार?
मोठी बातमी! कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पहाच
अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा
Rahul Gandhi on Amit Shah | अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा थेट हल्ला!
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू थेट
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू यांची थेट अमित शाह यांच्यासोबत बैठक, पडद्याआड मोठ्या अडामोडी
इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला प्रस्ताव
मोठी बातमी! इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला मोठा प्रस्ताव!
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबंधित...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच होणार मोठा फेरबदल, पुढे...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच  होणार मोठा फेरबदल, पुढे काय घडणार ?
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
मोठी बातमी! मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय असणार?
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय; तुमच्या खिशावर काय परिणाम?