Anupam Kher | अनुपम खेर यांच्या ‘या’ आगामी चित्रपटाबद्दल वाढली उत्सुकता, फर्स्ट लूक पाहून थेट…
बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर हे नेहमीच चर्चेत असतात. अनुपम खेर हे सोशल मीडियावर सक्रिय असून नेहमीच आपल्याच चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. अनुपम खेर यांनी नुकताच एक पोस्ट शेअर केलीये. ज्यामुळे ते चर्चेत आहेत.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. काही दिवसांपूर्वीच सतीश काैशिक यांच्या लेकीसोबत रिल्स बनवताना अनुपम खेर हे दिसले होते. सतीश काैशिक यांच्या अचानकपणे जाण्याने अनुपम खेर यांना मोठा धक्का बसल्याचे दिसले. सतीश काैशिक (Satish Kaishik) आणि अनुपम खेर यांनी आपल्या करिअरची सुरूवात सोबतच केली होती. सतीश काैशिक यांच्या निधनाची बातमी सर्वात अगोदर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनुपम खेर यांनीच दिली होती. अनुपम खेर यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते.
नुकताच अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे अनुपम खेर हे चर्चेत आहेत. विशेष म्हणजे अनुपम खेर यांचा लूक पाहुन चाहते हैराण झाल्याचे बघायला मिळत आहेत. अनुपम खेर यांनी त्यांच्या आगामी चित्रपटातील त्यांचा लूक शेअर केला आहे. जबरदस्त लूकमध्ये अनुपम खेर हे दिसत आहेत.
आता सोशल मीडियावर अनुपम खेर यांनी शेअर केलेली पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनुपम खेर यांचा लूक पाहून आतापासूनच चाहते त्यांच्या या चित्रपटाची वाट पाहताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या आगामी चित्रपटामध्ये अनुपम खेर हे रवींद्रनाथ टागोर यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
अनुपम खेर यांनी एक क्लीप शेअर केलीये, या क्लीपमध्ये ते रवींद्रनाथ टागोर यांच्या लूकमध्ये दिसत आहेत. अनुपम खेर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मी माझ्या 538 व्या प्रोजेक्टमध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची भूमिका साकारत असल्याने मला खूप जास्त आनंद होत आहे. खरोखर मला पडद्यावर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची भूमिका साकारण्यास मिळाल्याने मी स्वत:ला खूप जास्त भाग्यवान समजतो.
या चित्रपटाची अधिक माहिती लवकरच तुमच्यासोबत शेअर करू, असेही म्हणताना अनुपम खेर हे दिसले आहेत. या चित्रपटाबद्दल अधिक काही माहिती मिळू शकली नाहीये. मात्र, अनुपम खेर यांच्या या पोस्टवरून हे तर स्पष्ट झाले आहे की, आगामी चित्रपटामध्ये अनुपम खेर हे रवींद्रनाथ टागोर यांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. आता अनुपम खेर यांची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
