AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जर कोणी वाईट वागत असेल तर..; सुधांशू पांडेनं मालिका सोडल्यानंतर ‘अनुपमा’ची पोस्ट

'अनुपमा'मध्ये वनराज शाहची भूमिका साकारणारा अभिनेता सुधांशू पांडेनं या मालिकेला रामराम केला आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या रुपाली गांगुलीसोबत त्याचे वाद होते, अशी चर्चा आहे. या चर्चांदरम्यान आता रुपालीनैे एक पोस्ट शेअर केली आहे.

जर कोणी वाईट वागत असेल तर..; सुधांशू पांडेनं मालिका सोडल्यानंतर 'अनुपमा'ची पोस्ट
रुपाली गांगुली, सुधांशू पांडेImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 30, 2024 | 3:35 PM
Share

छोट्या पडद्यावरील ‘अनुपमा’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र लॉकडाऊनच्या काळात सुरू झालेल्या या मालिकेतून आतापर्यंत बऱ्याच कलाकारांची एक्झिट झाली. त्यात नुकतीच आणखी एक भर पडली. ‘अनुपमा’मध्ये वनराज शाहची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सुधांशू पांडेनं ही मालिका सोडली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत त्याने याबद्दलची माहिती दिली. सुधांशूने मालिकेत खलनायकाची भूमिका साकारली. मात्र तरीसुद्धा त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. या मालिकेत अभिनेत्री रुपाली गांगुली अनुपमाची भूमिका साकारत असून सुधांशूने मालिका सोडल्याचं जाहीर केल्यानंतर या दोघांमधील वादाची चर्चा होऊ लागली आहे.

सुधांशू पांडेसोबतच्या वादाची चर्चा होत असतानाच रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अध्यात्मिक गुरू सदगुरूंनी दिलेला एक संदेश पोस्ट केला आहे. ‘जर कोणी तुमच्यासोबत वाईट वागत असेल तर आधी त्याच्याशी प्रेमाने वागा. जर त्यानेही काही फरक पडत नसेल तर दया दाखवा. असं करूनही बदल होत नसेल तर त्या व्यक्तीपासून स्वत:ला दूर करा’, अशा आशयाची ही पोस्ट आहे. मालिकेच्या सेटवर सुधांशू आणि रुपाली यांचं एकमेकांशी पटायचं नाही, अशी चर्चा होती. रुपालीसोबतच्या वादामुळेच त्याने मालिका सोडल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये होत आहे.

सुधांशूने इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत मालिका सोडत असल्याचं सांगितलं. “तुम्हा सर्वांना माहितच आहे की मी गेल्या चार वर्षांपासून अनुपमा या मालिकेशी जोडला गेलोय. या भूमिकेमुळे मला खूप सारं प्रेम आणि तेवढीत प्रेक्षकांची नाराजीसुद्धा मिळाली. पण ती नाराजी माझ्यासाठी प्रेमच आहे. कारण जर तुम्ही माझ्यावर नाराज झाले नसता, तर मी माझं काम योग्य करतोय असं वाटलंच नसतं. आज मीा तुम्हाला जड अंत:करणाने हे सांगू इच्छितो की मी यापुढे अनुपमा या मालिकेत दिसणार नाही. रक्षाबंधनपासूनच मी ही मालिका सोडली आहे. इतके दिवस झाले आणि माझ्या प्रेक्षकांना असं वाटू नये की मी न सांगताच निघून गेलो, म्हणून हा व्हिडीओ पोस्ट करतोय. आता मी या मालिकेत वनराज शाहची भूमिका साकारताना दिसणार नाही. तुम्हा सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद आणि माफ करा कारण मला अचानक हा निर्णय घ्यावा लागला आहे,” असं त्याने म्हटलंय.

‘अनुपमा’ या मालिकेला आतापर्यंत तोषूची भूमिका साकारणारा आशिष मल्होत्रा, समर शाहच्या भूमिकेतील अभिनेता पारस कलनावत, पाखीच्या भूमिकेतील अभिनेत्री मुस्कान बामणे या कलाकारांनी रामराम केला आहे. या मालिकेत रुपाली गांगुली, गौरव खन्ना, निधी शाह आणि मदालसा शर्मा मुख्य भूमिकेत आहेत.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान