गरोदरपणावर अनुष्का शर्मा म्हणते...

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohalil) अनेक दिवस त्यांचं प्रेमाचं नात लपवण्याचा प्रयत्न केला होता.  त्यांचे लग्नही शांततेत आणि सिक्रेट पद्धतीने करण्यात आली होती.

गरोदरपणावर अनुष्का शर्मा म्हणते...

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) अनेक दिवस त्यांचं प्रेमाचं नातं लपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कालांतराने या दोघांनीही लग्न केले. लग्न झाल्यानंतर त्यांचे चाहते आता त्यांच्या बाळाची वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी अनुष्का (Anushka Sharma) गरोदर असल्याची अफवा पसरली होती. पण अनुष्काने यावर स्पष्टीकरण देत, असं काही नाही हे सर्व खोटं असल्याचे सांगितले.

“एक अभिनेत्री जेव्हा लग्न करते तेव्हा तिला पहिला प्रश्न तिच्या गरोदरपणावर विचारला जातो, असं अनुष्का शर्मा फिल्म फेअरमधील मुलाखतीत म्हणाली. एखादी अभिनेत्री जर कुणाला डेट करत असेल, तर लग्न कधी करणार असा प्रश्नही तिला विचारला जातो. ज्या अभिनेत्रींचे लग्न होते. त्यांच्याबद्दल काहीना काही बोललं जातं”, असं अनुष्काने सांगितले.

अनुष्का म्हणाली, “कुणी काहीही कपडे घालू शकतात. एखाद्या अभिनेत्रीने सैल ड्रेस घातला, तर ती गरोदर आहे म्हणून ढिला ड्रेस घातला असेल, असे अनेक तर्क वितर्क लावले जातात. मग यानंतर अफवा पसरतात. आपण यावर काही करु शकत नाही. फक्त दुर्लक्ष करु शकतो”.

गरोदरपणावर पसरवणाऱ्या अफवांबद्दल अनुष्का म्हणाली, “इतरांना त्यांचे जीवन जगायला दिले पाहिजे. काही लोकं का असं वातावरण तयार करतात की, जिथे एखाद्या व्यक्तिला जबरदस्ती स्पष्टीकरण द्यावे लागते. मला तर ही गोष्ट सर्वात वाईट वाटते. काहीदिवसांपूर्वी अभिनेत्री प्रियंका चोप्राही गरोदर असल्याची अफवा पसरली होती. एका ज्योतिषाने तर भविष्यवाणी केली आहे की देसी गर्ल येणाऱ्या दोन वर्षात आई होऊ शकते”.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *