AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहली याने शतक करताच लोकांच्या नजरा थेट अनुष्का शर्मा हिच्याकडे, अभिनेत्रीने भर मैदानात चक्क….

अनुष्का शर्मा हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवलाय. मात्र, अनुष्का शर्मा हिचे चाहते सतत तिच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. अनुष्का शर्मा हिचा 2019 मध्ये शेवटचा जिरो हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर अनुष्का शर्मा ही कोणत्याच चित्रपटात दिसली नाहीये.

विराट कोहली याने शतक करताच लोकांच्या नजरा थेट अनुष्का शर्मा हिच्याकडे, अभिनेत्रीने भर मैदानात चक्क....
| Updated on: Nov 15, 2023 | 9:00 PM
Share

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंडचा सामना सुरू आहे. या सामन्यात विराट कोहली याने धडाकेबाज कामगिरी केलीये. विश्वचषक 2023 उपांत्य फेरीचा हा महत्वाचा सामना सुरू आहे. या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्याचे बघायला मिळतंय. बाॅलिवूड स्टार हे भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी पोहचले आहेत. विराट कोहली याची पत्नी आणि बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही देखील स्टेडियममध्ये उपस्थित आहे. विराटने 50 वे शतक नोंदवले, तेंव्हा भर मैदानात अनुष्का शर्मा ही विराटला फ्लाइंग किस देताना दिसली.

अनुष्का शर्मा हिच्या फ्लाइंग किसचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, विकी काैशल, रणबीर कपूर असे बरेच कलाकार सामना बघण्यासाठी पोहचले आहेत. इतकेच नाही तर या सामन्याकडे सर्वांच्याच नजरा असल्याचे बघायला मिळतंय. चाहत्यांमध्ये या सामन्याबद्दलचे एक मोठे क्रेझ बघायला मिळत आहे. भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत.

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

विराट कोहली याने आपले 50 वे शतक पूर्ण करताच बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत विराट कोहली याचे काैतुक केले. यासोबत त्यांनी एक अत्यंत खास असा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.

अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर स्टेडियममधील व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले की, असा विराट कोहली याने इतिहास रचला…आणि आम्हा भारतीयांना याचा अभिमान आहे…जय हो! जिंदाबाद…आता अनुपम खेर यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

विराट कोहली याने आपले शतक पूर्ण करताच अनुष्का शर्मा ही उभे राहून टाळ्या वाजवताना आणि विराट कोहली याला फ्लाइंग किस देताना दिसली. फक्त अनुष्का शर्मा हिच नाही तर स्टेडियममध्ये उपस्थित असलेले चाहते देखील उभे राहून टाळ्या वाजवत विराट कोहली याचे काैतुक करताना दिसले. विराटच्या शतकानंतर अनुष्का शर्मा हिच्या चेहऱ्यावर मोठा आनंद बघायला मिळाला.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.