‘म्हाताऱ्या माणसासोबत…’, 22 वर्ष मोठ्या अरबाज खान सोबत लग्नाचा शूराला होतोय पश्चाताप? ट्रोल होताच म्हणाली…
'म्हाताऱ्या माणसासोबत...', 22 वर्ष मोठ्या अरबाज खान सोबत लग्नाचा शूराला होतोय पश्चाताप? चाहत्यांने एक प्रश्न विचारताच का भडली खान कुटुंबियांची सून... ट्रोल होताच म्हणाली..., सध्या सर्वत्र शूरा आणि अरबाज खान यांच्या नात्याची चर्चा..

अभिनेता अरबाज खान आणि शूरा खान यांची जोडी बॉलिवूडच्या टॉप कपल पैकी एक आहे. त्यांना कायम एकत्र अनेक ठिकाणी स्पॉट केलं जातं सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. अभिनेत्री मलायका हिच्यानंतर 22 वर्ष लहान शूरा हिच्यासोबत संसार थाटल्यामुळे अरबाज याला अनेकदा ट्रोल देखील करण्यात आलं. एवढंच नाही तर, शूरा हिला देखील टीकेचा सामना करावा लागला… अशात नुकताच शूरा हिने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. सध्या सर्वत्र शूरा हिने चाहत्यांना दिलेल्या सडेतोड उत्तराबद्दल मोठी चर्चा रंगली आहे. तर जाणून नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे.
सांगायचं झालं तर, नुकताच शूरा खान हिने सोशल मीडियावर आस्क मीं एनिथिंग सेशन ठेवलं होतं. जेथे तिने नेटकऱ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. याच दरम्यान, शूरा हिला, अरबाज याच्यासोबतच्या खासगी आयुष्याबद्दल विचारण्यात आलं… एका नेटकऱ्यारे शूरा हिला विचारलं, ‘तू म्हाताऱ्या माणसासोबत आनंदी आहेस?’ यावर शूराने स्पष्ट उत्तर देत नेटकऱ्याची बोलतीच बंद केली आहे.
अरबाज खानसोबतच्या तिच्या नात्याबद्दल विचारलं असता शुरा खान हिने एक धाडसी आणि चोख प्रत्युत्तर दिलं. या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली, “तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? ते काही म्हातारे नाहीत; ते तर ‘लिमिटेड-एडिशन विंटेज मॉडेल’ आहेत.” शूरा खानची ही प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
अरबाज खान आणि शूरा खान यांच्या वयातील अंतर…
अरबाज खान आणि शूरा खान यांच्या वयाबद्दल सांगायचं झालं तर, दोघांच्या वयाच्या अंतरात फार मोठा फरक आहे. दोघांमध्ये तब्बल 22 वर्षांचं अंतर आहे. अरबाज खान याचं वय 58 वर्ष तर, दुसरी बायको शूरा हिचं वय 36 वर्ष आहे… डिसेंबर 2023 मध्ये शूरा आणि अरबाज यांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्यानंतर 5 ऑक्टोबर 2025 मध्ये दोघांनी गोंडस मुलीचं जगात स्वागत केलं. दोघांच्या मुलीचं नाव सिपारा असं आहे. अरबाज आणि शूरा यांनी मुलीसाठी अद्याप नो फोटो पॉलिसी कायम ठेवली आहे.