AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्चना पूरण सिंह हिने 7 वर्ष लहान नवऱ्यासाठी केलं नको ते काम, खंत व्यक्त करत म्हणते, ‘नाही बोलूच शकत नव्हते, कारण…’

Archana Puran Singh : अर्चना पूरण सिंह हिने झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. पण हा प्रवास अभिनेत्रीसाठी सोपा नव्हता. यशाच्या शिखरावर चढण्यासाठी अर्चना हिला अनेक कठीण पायऱ्या चढाव्या लागल्या आहेत... तर नवऱ्याचं करियर सावरण्यासाठी अभिनेत्री मोठी भूमिका बजावली आहे.

अर्चना पूरण सिंह हिने 7 वर्ष लहान नवऱ्यासाठी केलं नको ते काम, खंत व्यक्त करत म्हणते, 'नाही बोलूच शकत नव्हते, कारण...'
Archana Puran Singh
| Updated on: Sep 02, 2026 | 12:19 PM
Share

Archana Puran Singh : अर्चना पूरण सिंह हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण एकदा अर्चना आणि पती परमीत सेठ यांनी त्या दिवसांच्या आठवणी ताज्या केल्या, जेव्हा अर्चना हिच्यावर संपूर्ण घराची जबाबदारी होती. सांगायचं झालं तर, अर्चना आणि परमित हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल पैकी एक आहेत. दोघांमध्ये 7 वर्षांचा फरक असून, अर्चना नवऱ्यापेक्षा मोठी आहे. दोघांच्या नात्याबद्दल फार कोणाला माहिती नसलेली गोष्ट म्हणजे, अर्चना हिने परमित याला लग्नासाठी पळवून नेलं होतं… एवढंच नाही तर त्यांनी चार वर्ष त्यांचं लग्न सर्वांपासून लपवून ठेवलेलं. त्यामुळे त्यांच्या बद्दल सर्वांचं एकच मत झालेलं आणि ते म्हणजे, दोघांचं नातं फार काळ टिकणार नाही. पण दोघे आज मुलं आर्यमान आणि आयुष्मान यांच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहेत.

घरातून पळून केलं लग्न…

ज्या लोकांना माहिती नाही, त्यांच्या सांगायचं झालं तर, अर्चना आणि परमीत यांची भेट एका पार्टीत झालेली. तेव्हा अर्चना पहिलं लग्न मोडल्यामुळे दुःखी होतं. एवढंच नाही तर, आता कोणत्याच पुरुषाला आयुष्यात एन्ट्री द्यायची नाही. पण अर्चना हिच्या नशिबात परमित याचा प्रवेश ठरलेलाच होता. दोघांनी पळून लग्न केलं आणि लग्नाबद्दल कोणाला काही सांगितलंच नाही,

अर्चनाने घर चालवण्याची जबाबदारी स्वीकारली तेव्हा…

अर्चना आणि परमीत यांच्या लग्नाला तीन दशकांहून अधिक काळ लोटलेला अर्चनाने घर चालवण्याची जबाबदारी स्वीकारली होती, त्या आव्हानात्मक काळाबद्दल या जोडप्याने एकदा सांगितलेलं, त्यावेळी परमीत चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता; त्यामुळे मला मिळालेला प्रत्येक प्रोजेक्ट ज्यात अनेक ‘सी-ग्रेड’ सिनेमांचाही समावेश होता. घराची जबाबदारी अर्चना हिच्या खांद्यावर असल्यामुळे अभिनेत्रीने सी ग्रेट सिनेमात देखील काम केलं आहे.

पुढे अर्चना म्हणाली, ‘परमित याने जबाबदारी स्वीकारली असती, तर मला सी ग्रेट सिनेमांमध्ये काम करण्याची गरज भासली नव्हती. कामाच्या बाबतीत माझा एक मंत्र होता आणि तो म्हणजे, कोणत्यात कामाला नाही म्हणायचं नाही. पण आता मी नाही बोलण्यास सुरुवात केली आहे. मी सी ग्रेट सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. कारण माझ्यावर माझ्या घराची जबाबदारी होती…

अर्चना असं देखील म्हणाली की, ‘मलाही मुख्य अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायती होती, पण तसं न घडल्यामुळे मी इतर वाटा निवडल्या. मी अँकर बनले आणि विनोदी तसेच सहाय्यक भूमिका स्वीकारल्या; इतकंच काय, तर मी खराब, ‘सी-ग्रेड’ आणि कमी बजेटच्या सिनेमांमध्येही काम केलं, तरीही मी माझी प्रतिष्ठा जपली. या सर्व काळात जर मी माझी प्रतिष्ठा जपली नसती, तर आज मी ज्या स्थानावर आहे, तिथे पोहोचू शकले नसते.’, सध्या सर्वत्र अर्चनाची चर्चा रंगली आहे.

Follow Us
पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत...
Farmers Issue | पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत 20-22 दिवसांपासून पाऊसच नाही
राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका!
MNS | राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका! नेमकं कारण काय?
धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक...
Sanjay Raut | धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक; चिन्ह गोठवण्याची केली मागणी
तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे..
Manoj Jarange Patil Andolan | तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे पाटलांचा भरत गोगावले यांना थेट इशारा
गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्...
Ganpati Idol Collapsed | गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्, पुढे जे झालं...
DJच्या आवाजावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या! सण साजरे करा, पण...
Amruta Fadnavis | DJच्या आवाजावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या! सण साजरे करा, पण...
ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! हाकेंची मोठी घोषणा
Laxman Hake | ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; पुढे म्हणाले...
धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?
Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?
मुंबईतील नगरसेवकांना मोठी खुशखबर! 12 वर्षांनंतर निधीत भरघोस वाढ...
Corporator's Funds | मुंबईतील नगरसेवकांना मोठी खुशखबर! 12 वर्षांनंतर निधीत भरघोस वाढ; 60 लाखांऐवजी आता मिळणार तब्बल...
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रोहित पवारांचं मोठं विधान!
Rohit Pawar | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रोहित पवारांचं मोठं विधान! अजितदादांच्या गटाने भाजपची साथ सोडली तर...