‘तो माझ्या मैत्रिणींसोबत’; भाऊ अर्जुनविषयी सोनम कपूरचा ‘कॉफी विथ करण’मध्ये मोठा खुलासा

कॉफी विथ करणचा आठवा सिझन येत्या 26 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्यापूर्वी या शोचे आधीचे सिझन्स चर्चेत आले आहेत. कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमध्ये अभिनेत्री सोनम कपूरने भाऊ अर्जुन कपूरसोबत हजेरी लावली होती. यावेळी तिने मोठा खुलासा केला होता.

'तो माझ्या मैत्रिणींसोबत'; भाऊ अर्जुनविषयी सोनम कपूरचा 'कॉफी विथ करण'मध्ये मोठा खुलासा
Sonam Kapoor and Arjun KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 3:36 PM

मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये आजवर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बरेच मोठमोठे खुलासे केले आहेत. करणच्या प्रश्नांपासून हे सेलिब्रिटी स्वत:ला वाचवू शकले नाहीत. आता या प्रसिद्ध शोचा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्यापूर्वी या शोच्या जुन्या सिझनमधील काही मुलाखतीत चर्चेत आल्या आहेत. कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमध्ये अभिनेत्री सोनम कपूर तिचा भाऊ अर्जुन कपूरची पोलखोल करताना दिसली. तिने म्हटलं होतं, “तिच्या भावापासून क्वचित एखादी तिची मैत्रीण वाचली असेल.”

कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमध्ये सोनम कपूरने तिच्या भावाला चांगलंच रोस्ट केलं होतं. करणने सोनमला प्रश्न विचारला होता, “अर्जुन कपूर तुझ्या किती मैत्रिणींसोबत झोपला आहे?” यावर सोनमने दिलेलं उत्तर ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. ती म्हणाली, “मी याबद्दल काही बोलत नाहीये, पण माझ्या सर्व भावंडांपासून कोणीच वाचू शकलं नाही.” हे ऐकून अर्जुननेही डोळे विस्फारले होते.

हे सुद्धा वाचा

करणसुद्धा सोनमचं उत्तर ऐकून थक्क झाला होता. तो पुढे म्हणाला, “तुझे भाऊ कशा पद्धतीचे आहेत?” अर्जुनसुद्धा सोनमला म्हणतो, “तू कशी बहीण आहेस, जी तिच्या भावंडांविषयी असं सगळं बोलते.” या एपिसोडमध्ये अर्जुन आणि सोनमसोबतच तिचा सख्खा भाऊ हर्षवर्धन कपूरसुद्धा उपस्थित होता.

कॉफी विथ करण या शोमध्ये, बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या मोठमोठ्या सेलिब्रिटींनी सहभाग घेतला आहे. या शोचे आतापर्यंत सात सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता लवकरच त्याचा आठवा सिझन येणार आहे. याच महिन्यात करण जोहरचा हा शो डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. या स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर शोच्या नव्या सिझनचा प्रोमोसुद्धा प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये करण जोहरने ‘कॉफी विथ करण 8’च्या सेटची झलक दाखवली आहे.

या प्रोमो व्हिडीओमध्ये सेटपासून कॉफी मगपर्यंत सर्वकाही दाखवण्यात आलं आहे. या व्हिडीओच्या अखेरीस स्पेशल कॉफी हँपरसुद्धा पहायला मिळतं. प्रेक्षकांनाही कॉफी विथ करणचा हा नवीन सेट खूपच आवडला आहे. येत्या 26 ऑक्टोबरपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी पाहुणे सहभागी होणार आहेत, हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

Non Stop LIVE Update
पवार काका-पुतणे भविष्यात एकत्र येणार? अजितदादा स्पष्टच म्हणाले, आमचं..
पवार काका-पुतणे भविष्यात एकत्र येणार? अजितदादा स्पष्टच म्हणाले, आमचं...
कोल्हे Vs दादा; पवारांच्या टीकेवर लाव रे तो व्हिडीओनं कोल्हेंचं उत्तर
कोल्हे Vs दादा; पवारांच्या टीकेवर लाव रे तो व्हिडीओनं कोल्हेंचं उत्तर.
महायुतीच्या जागेचा फॉर्म्युला, शाहांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब होणार
महायुतीच्या जागेचा फॉर्म्युला, शाहांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब होणार.
वेळीच गुंडांना आवर घाला... हर्षवर्धन पाटलांचं गृहमंत्र्यांकडे गाऱ्हाणं
वेळीच गुंडांना आवर घाला... हर्षवर्धन पाटलांचं गृहमंत्र्यांकडे गाऱ्हाणं.
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार.
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर.
'वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण...,' काय म्हणाल्या अंकिता पाटी
'वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण...,' काय म्हणाल्या अंकिता पाटी.
मी माझा मालक आहे, आमचं अजून....,' काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
मी माझा मालक आहे, आमचं अजून....,' काय म्हणाले प्रकाश आंबेडकर.
गुवाहाटीत आमदाराने एअर होस्टेसचा विनयभंग केला, ॲड. असीम सराेदे
गुवाहाटीत आमदाराने एअर होस्टेसचा विनयभंग केला, ॲड. असीम सराेदे.
कल्याण लोकसभा निवडणूक लढविणार का? काय म्हणाले राजू पाटील
कल्याण लोकसभा निवडणूक लढविणार का? काय म्हणाले राजू पाटील.