AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drugs Case | मेहुणा अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सची सुटका, अर्जुन रामपालला एनसीबीकडून पुन्हा समन्स

ड्रग्ज प्रकरणी चौकशीसाठी अर्जुन रामपाल याला उद्या (16 डिसेंबर) पुन्हा बोलावण्यात आलं आहे.

Drugs Case | मेहुणा अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सची सुटका, अर्जुन रामपालला एनसीबीकडून पुन्हा समन्स
| Updated on: Dec 15, 2020 | 4:35 PM
Share

मुंबई : अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याला पुन्हा एकदा एनसीबीने समन्स बजावलं आहे. ड्रग्ज प्रकरणी चौकशीसाठी अर्जुन रामपाल याला उद्या (16 डिसेंबर) पुन्हा बोलावण्यात आलं आहे. तर, अर्जुन रामपाल याचा मेहुणा अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्स याचा जामीन आज (15 डिसेंबर) मंजूर झाला आहे. त्याला तुरुंगातून सोडण्यात आले आहे.

एनसीबीने यापूर्वीही अर्जुन रामपाल याला चौकशीसाठी बोलावलं होतं. 17 नोव्हेंबर रोजी अर्जुन रामपाल याची सहा तास चौकशी झाली होती. यात अर्जुन रामपाल याला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. अर्जुनच्या घरी ट्रामाडॉल या औषधांच्या गोळ्या सापडल्या होत्या. या औषधावर भारतात बंदी आहे. या टॅब्लेट ड्रग्ज प्रकारात मोडतात. याबाबत अर्जुन रामपाल याला खुलासा करायचा होता (Arjun Rampal Summoned by NCB Once again in Drug Case).

या तीन मुद्यांवर अर्जुन रामपालची चौकशी

  1. अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्स याच्या बाबत चौकशी झाली होती. अ‍ॅगिसिलोस हा अर्जुन रामपाल याचा मेहुणा आहे. त्याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. तो आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांच्या संपर्कात होता.
  2. अर्जुन रामपाल याच्या घरी बंदी घातलेलं औषध सापडलं होतं.
  3. एनसीबी अधिकाऱ्यांनी पॉल बारटेल याला अटक केली आहे. पॉल हा ऑस्ट्रेलियाचा नागरिक असून तो अर्जुन रामपाल याचा मित्र आहे. पॉल याचे ही आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाशी संबंध असल्याचं उघडकीस आलं आहे. पॉल याच्या आंतरराष्ट्रीय माफिया सोबत असलेल्या संबंधा बाबत रामपाल यांच्याकडे चौकशी करण्यात आली होती.

यावेळी अर्जुन रामपाल याने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली होती. रामपाल यांच्याकडे जे ट्रामाडॉल हे बंदी असलेलं औषध सापडलं होत. त्याचा खुलासा ही त्याने केला होता. आपण दिलेल्या उत्तर नंतर एनसीबी अधिकाऱ्यांच समाधान झालं असावं, असं अर्जुन रामपाल याला वाटत होतं. मात्र, आता एनसीबीने त्याला पुन्हा हजर राहण्याबाबत समन्स बजावले आहे. त्यामुळे रामपाल याला उद्या पुन्हा एनसीबी कार्यालयात यावं लागणार आहे (Arjun Rampal Summoned by NCB Once again in Drug Case).

कोण आहे अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्स?

अर्जुन रामपाल याची लिव्ह इन गर्लफ्रेंड गब्रिएला हिची देखील चौकशी करण्यात आली होती. अर्जुन आणि गब्रिएला हे दोघे वांद्रे येथे राहतात. त्यांच्या सोबत गब्रिएला हिचा भाऊ अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्स हा देखील राहत होता. गेल्या महिन्यात एनसीबी अधिकाऱ्यांनी अ‍ॅगिसिलोस याला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले होते. वेगवेगळ्या प्रकारचे हे ड्रग्ज होते. तपासात अ‍ॅगिसिलोस हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांच्या संपर्कात असल्याचं उघड झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

अ‍ॅगिसिलोस, अर्जुन रामपाल याच्या घरी राहत असल्याने अर्जुन रामपाल ही एनसीबी अधिकाऱ्याच्या रडारवर आला होता. अ‍ॅगिसिलोसने आपल्याला जामीन मिळावा म्हणून मुंबई सेशन कोर्टात अर्ज केला होता. अखेर आज (15 डिसेंबर) त्याला पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला. यावेळी त्याने पासपोर्ट जमा करावा, तसेच देश सोडून जाऊ नये, कुठे जायचे असल्यास परवानगी घेऊन जावं, असं कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.

(Arjun Rampal Summoned by NCB Once again in Drug Case)

भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....