AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुन्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी पोहोचली अरमान मलिकची पहिली पत्नी, लोक म्हणाले, तुम्ही…

अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉस ओटीटी 3 मध्ये पोहोचला होता. मात्र, पायल मलिक ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलीये. आता पायल मलिक हिने घरातून बाहेर पडल्यानंतर मोठे खुलासे केले आहेत. पायलचा विमानतळावरील एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

जुन्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी पोहोचली अरमान मलिकची पहिली पत्नी, लोक म्हणाले, तुम्ही...
payal malik
| Updated on: Jul 03, 2024 | 6:37 PM
Share

अरमान मलिक हा बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सर्वाधिक चर्चेत असणारे एक नाव आहे. अरमान मलिक हा बिग बॉसच्या घरात आपल्या दोन्ही पत्नींसोबत पोहोचला होता. मात्र, अरमान मलिकची पहिली पत्नी पायल ही बिग बॉसमधून बाहेर आलीये. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अनेक मोठे खुलासे करताना पायल ही दिसलीये. विशेष म्हणजे अरमान मलिक हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे. अरमान मलिक याने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले की, त्याच्याकडे 200 कोटींची एकून संपत्ती आहे.

व्लॉगच्या माध्यमातून मलिक कुटुंबिय चाहत्यांच्या संपर्कात असतात. सध्या पायल मलिक हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये पायल मलिक मोठा खुलासा करताना दिसतंय. या व्हिडीओमध्ये पायल मलिक म्हणते की, मी आज माझ्या लहानपणीच्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी जात आहे.

विशेष म्हणजे याबद्दल अरमानला देखील माहिती आहे. प्रत्येकाचे लहानपणीचे प्रेम असते कोणीही धुतलेल्या तांदळाचे नसते. मला माझ्या लहानपणीच्या बॉयफ्रेंडने मेसेज केला आणि त्याला भेटण्यासाठी मी जात आहे. तो मला भेटण्यासाठी कॅफेत आल्याचे सांगताना देखील व्हिडीओमध्ये पायल ही दिसत आहे.

मी माझ्या लहापणीच्या बॉयफ्रेंडला गोलूला देखील भेटवणार आहे. मी अगोदरच याच्याबद्दल अरमानजीला सांगितले होते. लहानपणीचे प्रेम असते ते आपण कधीच विसरू शकत नसल्याचे सांगताना देखील पायल ही दिसत आहे. आता हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी पायलला खडेबोल देखील सुनावले आहेत. पायलचा व्हिडीओ बिग बॉसमध्ये सहभागी होण्याच्या अगोदरचा आहे.

एकाने या व्हिडीओवर कमेंट करत थेट म्हटले की, तुमचे सर्व कुटुंबच असे आहे का? दुसऱ्याने लिहिले की, पायल हे काय बोलत आहे. आता पायल मलिक ही तिच्या घरी पोहोचलीये. पायलचे विमानतळावर जोरदार स्वागत तिच्या कुटुंबाकडून करण्यात आले. हेच नाहीतर तिचे चारही लेकरं तिला घेण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.