अरे म्हातारी आहे ही तर… शाहरुखच्या लेकाची कथित गर्लफ्रेंड बघून नेटकरी बहकले; कमेंट्सचा पाऊसच पाऊस
Aryan Khan's girlfriend : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एका ब्राझिलियन अभिनेत्रीला डेट करतोय. आर्यनने दिग्दर्शित केलेल्या वेब सीरिजच्या प्रीमिअरला ती उपस्थित होती. यावेळी पापाराझींनी तिचा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला.

Aryan Khan’s girlfriend : बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याच्या करिअरची अत्यंत ग्रँड पद्धतीने सुरुवात केली आहे. परंतु वडिलांप्रमाणे तो अभिनयक्षेत्रात नाही तर दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. त्याच्या करिअरमधील पहिलीवहिली वेब सीरिज ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजच्या प्रदर्शनापूर्वी त्याचा ग्रँड प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. या प्रीमिअरला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. शाहरुखच्या मुलाचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असल्याने बॉलिवूड इंडस्ट्रीतील आणि बिझनेस विश्वातील नामांकित चेहरे या प्रीमिअरला उपस्थित होते. परंतु या सर्वात आर्यन खानच्या गर्लफ्रेंडने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.
सोशल मीडियावर आर्यनच्या गर्लफ्रेंडचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आर्यन ब्राझिलियन अभिनेत्री लारिसा बोनेसीला (Larissa Bonesi) डेट करत असल्याची चर्चा आहे. मुंबईतील एनएमएसीसी याठिकाणी आयोजित केलेल्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’च्या प्रीमिअरला ती अत्यंत ग्लॅमरस अंदाजात पोहोचली होती. यावेळी तिने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. लारिसा रेड कार्पेटवर पापाराझींसमोर येताच सर्वांची नजर तिच्यावर पडली. यावेळी तिने फोटोसाठी पोझसुद्धा दिले. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी तिला ट्रोलसुद्धा केलं आहे. ‘ही तर आंटी आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘अरे ही म्हातारीच दिसते’, असं दुसऱ्याने लिहिलंय. तर काहीजण लारिसाच्या लूकचं कौतुकसुद्धा करत आहेत.
View this post on Instagram
रेड चिलीज एंटरटेन्मेंट निर्मित ‘द बॅड्स ऑफ’मध्ये बॉबी देओल, लक्ष्य, मोना सिंह आणि साहेर बंबा यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. त्याचसोबत सलमान खान, आमिर खान, रणवीर सिंह आणि करण जोहर यांसारख्या मोठमोठ्या सेलिब्रिटींनी यामध्ये पाहुण्या कलाकारांची भूमिका साकारली आहे. ही वेब सीरिज आजपासून (गुरुवार) नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. आर्यनने या प्रोजेक्टसाठी चार वर्षांची कठोर मेहनत घेतली आहे. “हजारो टेक घेतल्यानंतर अखेर हा शो तयार झाला आहे. मी त्या सर्वांचा आभारी आहे, ज्यांच्याशिवाय हा शो बनूच शकला नसता” असं त्याने म्हटलंय.
