AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिढ्या बदलल्या, संगीताचा ट्रेंड बदलला, पण 53 वर्षांपासून या गाण्याची क्रेझ कायम, वाजताच महिला धरतात ठेका

आशा भोसले यांचं 53 वर्षांपूर्वीचं सर्वात गाजलेलं गाणं. ज्याची इतकी क्रेझ की अनेक पिढ्या बदलून देखील या गाण्याचा ट्रेंड कमी झाला नाही. आजही अनेक महिला गाण्यावर धरतात ठेका.

पिढ्या बदलल्या, संगीताचा ट्रेंड बदलला, पण 53 वर्षांपासून या गाण्याची क्रेझ कायम, वाजताच महिला धरतात ठेका
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 05, 2026 | 3:12 PM
Share

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गायिका आशा भोसले यांनी आपल्या सुरेल आवाजाने अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांनी गायलेलं प्रत्येक गाणं आपल्या वेगळ्या अंदाजामुळे आजही लोकप्रिय आहे. असंच त्यांचं एक 53 वर्ष जुनं गाणं आजही पार्ट्यांमध्ये मोठ्या उत्साहाने ऐकलं जातं. विशेष म्हणजे महिलांच्या किट्टी पार्ट्यांमध्ये या गाण्याची खास क्रेझ पाहायला मिळते. हे गाणं म्हणजे ‘हंगामा हो गया’.

‘हंगामा हो गया’ हे गाणं 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अनहोनी’ या चित्रपटातील आहे. संजीव कुमार, किट्टी ईरानी, लीना चंदावरकर आणि बिंदू यांसारख्या कलाकारांच्या भूमिका असलेल्या या सिनेमातील हे गाणं विशेष गाजलं. अभिनेत्री बिंदू यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्यात त्यांचा दमदार अंदाज पाहायला मिळतो.

आशा भोसले यांच्या आवाजातील ठेका आणि गाण्याची उत्साही चाल यामुळे ‘हंगामा हो गया’ आजही जुनं न वाटता तितकंच फ्रेश आणि एंटरटेनिंग वाटतं. त्यामुळे लग्नसमारंभ, पार्टी किंवा किट्टी पार्टी असो हे गाणं वाजलं की वातावरणात उत्साह संचारतो.

लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या संगीताची जादू

या गाण्याला आशा भोसले यांच्या आवाजासोबत संगीतकार जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या संगीताची साथ लाभली होती. तर या गाण्याचे बोल गीतकार वर्मा मलिक यांनी लिहिले होते. आवाज, संगीत आणि बिंदू यांचा परफॉर्मन्स यामुळे हे गाणं त्याकाळात लोकप्रिय ठरलं आणि आजही त्याची लोकप्रियता कायम आहे.

अभिनेत्री बिंदू यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या. त्यामुळे त्यांना हिंदी सिनेसृष्टीतील ‘लेडी व्हिलन’ म्हणूनही ओळखलं जातं. मात्र, ‘अनहोनी’मधील ‘हंगामा हो गया’ या गाण्याने त्यांच्या ग्लॅमरस आणि दमदार अंदाजाची वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली.

‘क्वीन’मध्येही नव्या अंदाजात आलं गाणं

जुन्या लोकप्रिय गाण्यांना नव्या अंदाजात सादर करण्याचा ट्रेंड बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून आहे. ‘हंगामा हो गया’ हे गाणंदेखील अभिनेत्री कंगना रनौतच्या ‘क्वीन’ या चित्रपटात नव्या रूपात पाहायला मिळालं. या नव्या व्हर्जनलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

म्हणूनच 53 वर्षांपूर्वी आशा भोसले यांच्या आवाजात आणि बिंदू यांच्या अभिनयातून गाजलेलं ‘हंगामा हो गया’ आजही रसिकांच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहे. पिढ्या बदलल्या, संगीताचा ट्रेंड बदलला, पण या गाण्याची क्रेझ मात्र अजूनही कायम आहे.

Follow Us
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्ष
Ahilyanagar Election : जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्षता जपण्यासाठी...
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी
'राऊतांना मोदींवर टीका करण्याचा अधिकार नाही', परिणय फुकेंचं वक्तव्य
Video :
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शहाजी बापू पाटलांचा यू-टर्न
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शहाजी बापू पाटलांचा यू-टर्न, विरोध मागे घेऊन प्रचारात सक्रिय
Video: ट्रिपल इंजिन सरकार विरोधात टोळीयुद्ध सुरू - हर्षवर्धन सपकाळ
Video: ट्रिपल इंजिन सरकार विरोधात टोळीयुद्ध सुरू - हर्षवर्धन सपकाळ
8 तास ड्युटी, अन्...; पोलिसांच्या कामाच्या तासांवर राऊतांच फडणवीसांना
Sanjay Raut : 8 तास ड्युटी, अन् 16 तास...; पोलिसांच्या कामाच्या तासांवर संजय राऊतांचं थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
वर्धा पदवीधर मतदार संघात मविआला मोठा झटका; त्या नेत्याची बंडखोरी करत..
MVA : वर्धा पदवीधर मतदार संघात मविआला मोठा झटका; त्या नेत्याची बंडखोरी करत थेट मैदानात एंट्री
10 बाटल्या भरल्या अन् खळबळ उडाली; विहिरीतून पेट्रोलसदृश ज्वलनशील....
Sangli : 10 बाटल्या भरल्या अन् खळबळ उडाली; विहिरीतून पेट्रोलसदृश ज्वलनशील पदार्थ, व्हिडिओ बघाच
ज्ञानेश कुमारांना दिलासा की पुढे संकट?; सुप्रीम कोर्टाने अंतरिम कारवाई
Gyanesh Kumar Hearing Update : ज्ञानेश कुमारांना दिलासा की पुढे संकट?; सुप्रीम कोर्टाने अंतरिम कारवाई नाकारली, कारण...