Ashadhi Ekadashi 2021: ‘सागरिका’ची सांगीतिक भेट, सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशींच्या सुमधूर आवाजात ‘आसावला जीव’

वारकऱ्यांच्या मनातली भावना मांडण्यासाठी सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशीच्या सुमधुर आवाजाने सजलेला 'आसावला जीव' हा नवा कोरा म्युझिक व्हिडीओ आषाढी एकादशीनिमित्त आपल्यासाठी सादर करण्यात आला आहे. (Ashadhi Ekadashi 2021: Musical gift from 'Sagarika Music', 'Asavala Jeev' in the melodious voice of well-known singer Aniruddha Joshi)

Ashadhi Ekadashi 2021: 'सागरिका'ची सांगीतिक भेट, सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशींच्या सुमधूर आवाजात 'आसावला जीव'


मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (Corona) सलग दुसऱ्या वर्षी वारी होणार नसल्यानं वारकरी आणि पंढरीच्या विठ्ठलाची आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi) गाठभेट होऊ शकणार नाही. त्यामुळे वारीला जाणाऱ्या अनेक भक्तांचा हिरमोड झाला. आपल्या लाडक्या विठुरायाला भेटायला प्रत्येक भक्ताचं मन आतुर झालंय. परंतु वाढत्या कोरोना संसर्गामुळे यंदाही वारी नाही.  म्हणूनच वारकऱ्यांच्या मनातली भावना मांडण्यासाठी सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशीच्या सुमधुर आवाजाने सजलेला ‘आसावला जीव’ हा नवा कोरा म्युझिक व्हिडीओ आषाढी एकादशीनिमित्त आपल्यासाठी सादर करण्यात आला आहे.

सागरिका म्युझिक आपल्यासाठी घेऊन आला आहे ‘आसावला जीव’

सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशीच्या सुमधुर आवाजाने सजलेला ‘आसावला जीव’, सागरिका म्युझिक आपल्यासाठी घेऊन आले असून हे गाणं अनिरुद्ध जोशीवरच चित्रित करण्यात आलं आहे. गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन अनिरुद्ध-अक्षय म्हणजेच अनिरुद्ध जोशी आणि अक्षय आचार्य यांचं आहे. संगीत संयोजन अमित पाध्ये यांनी केलं आहे तर हॅण्डलॉक इव्हेंट अँड फिल्म्सनं या व्हिडीओचे चित्रीकरण केले आहे.

पाहा गाणं

शेकडो किलोमीटर चालत जाऊन पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल रखुमाईला डोळे भरून पाहणं, चंद्रभागेत स्नान करणं ही कित्येक शतकांची आपली परंपरा आहे. मात्र करोना विषाणूनं या परंपरेत खंड पाडला आहे. काही वाऱ्या, पालख्या पंढरीत जाणार असल्या तरी वारकऱ्यांना घरी राहूनच विठूनामाचा गजर करावा लागणार आहे. सलग दुसऱ्या वर्षीही आषाढी एकादशी विठ्ठलाच्या प्रत्यक्ष दर्शनाविना जाणार असल्यानं वारकरी आसावले आहेत. हीच भावना या म्युझिक व्हिडीओतून मांडण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

‘आई कुठे काय करते’चा मी मोठा चाहता! ‘अविनाश देशमुख’ साकारण्याविषयी शंतनू मोघे म्हणतात…

Indian Idol 12|अटी-तटीच्या सामना अन् शेवटच्या टप्प्यात पवनदीप गाण्याचे बोलच विसरला! एक चूक महागात पडणार?

‘भोंग्याचा आणि धर्माचा काही संबंध असतो का?’ अजाणावर भाष्य करणाऱ्या ‘भोंगा’ चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस!

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI