आशिष विद्यार्थींनी 60 व्या वर्षी केला दुसरा विवाह, रुपाली बरूआशी केले रजिस्टर मॅरेज

Ashish Vidyarthi wedding : प्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी ६० व्या वर्षी आसामच्या रुपाली बरुआसोबत लग्न केले आहे. आशिष यांनी गुरुवारी रुपालीसोबत कलकत्ता येथे रजिस्टर मॅरेज केले.

आशिष विद्यार्थींनी 60 व्या वर्षी केला दुसरा विवाह, रुपाली बरूआशी केले रजिस्टर मॅरेज
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 5:21 PM

कलकत्ता : बॉलिवूडमधील अभिनेते आणि खलनायकाच्या भूमिकेत जास्त गाजलेले आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी विवाह केला आहे. आशिष यांनी वयाच्या ६० व्या वर्षी आसामच्या रुपाली बरुआशी (Rupali Barua) लग्न केले. आशिष यांनी रुपालीसोबत गुरुवारी रजिस्टर मॅरेज केले. केला आहे. त्यांचे हे दुसरे लग्न आहे. ‘आयुष्याच्या या टप्प्यावर रुपालीशी लग्न करणे ही एक असामान्य भावना आहे.’ असे आशिष यांनी नमूद केले. आशिष विद्यार्थी यांनी 11 हून अधिक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते कित्ये वर्षांपासून चित्रपट जगताचा एक भाग आहे. आशिष आणि रुपाली यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

गुरुवारी कलकत्ता येथे पार पडलेल्या या लग्नात फक्त त्याचे कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर आता हे कपल मित्र आणि नातेवाईकांसाठी रिसेप्शन पार्टी ठेवणार आहे. आशिष यांच्या पत्नीबद्दल सांगायचे झाले तर रुपाली बरूआ या आसाममधील फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटी येथील रहिवासी रुपाली या कलकत्ता येथील एका फॅशन स्टोअरच्या मालक आहेत.

‘आयुष्याच्या या टप्प्यावर रुपालीशी लग्न करणे ही एक असामान्य भावना आहे. सकाळी आमचं कोर्ट मॅरेज झालं आणि संध्याकाळी आमचं गेट-टूगेदर होणार आहे,’ अस आशिष यांनी नमूद केले, . आपल्या प्रेमकथेबद्दल मीडियाशी बोलताना आशिष म्हणाले, ‘अहो, ही खूप मोठी गोष्ट आहे, त्याबद्दल परत कधीतरू बोलू. ’ यावर रुपाली म्हणाली, ‘आम्ही काही काळापूर्वी भेटलो होतो आणि आम्ही आमचे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता. आमचे लग्न अगदी साधेपणाने व्हावे अशी आम्हा दोघांची इच्छा होती.

रुपालीपूर्वी आशिषचे लग्न अभिनेत्री राजोशी विद्यार्थीसोबत झाले होते. राजोशी एक प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आणि नाट्य कलाकार आहेत. आशिष विद्यार्थी यांच्याबद्दल सांगायचे तर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह 11 भाषांमधील 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते तामिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी भाषेतील चित्रपटांमध्ये दिसले आहेत. ‘बिच्चू’, ‘जिद्दी’, ‘अर्जुन पंडित’, ‘वास्तव’, ‘बादल’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. अलीकडेच अभिनेते अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट ‘गुडबाय’ मध्ये देखील ते दिसले होते. आशिष विद्यार्थी हे सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतात आणि फूड ब्लॉगिंग देखील करतात.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.