AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राचा सूर हरपला…, आशा ताईंच्या निधनावर अशोक सराफ, महेश कोठारे यांच्याकडून शोक व्यक्त

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर सिने आणि संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर अशोक सराफ, महेश कोठारे यांनी शोक व्यक्त केला.

महाराष्ट्राचा सूर हरपला..., आशा ताईंच्या निधनावर अशोक सराफ, महेश कोठारे यांच्याकडून शोक व्यक्त
| Updated on: Apr 12, 2026 | 1:28 PM
Share

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज निधन झालं आहे. शनिवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. डॉक्टरांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली, सर्व अवयव निकामी झाल्याने (मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे) त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. त्यांना मेडिकल प्रॉब्लेम होता, असंदेखील डॉक्टर म्हणाले. त्यांच्या निधनानंतर अनेकांना प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त केलं आहे.

आशा ताईंच्या निधनानंतर अभिनेते अशोक सराफ म्हणाले, एकदा त्यांचं रेकॉर्डिंग सुरु होतं. माझ्याच सिनेमासाठी रेकॉर्डिंग सुरु होतं… मी देखील रेकॉर्डिंगसाठी गेलेलो… तेव्हा मध्ये ‘काय’ असा शब्द बोलायचा होता… ‘तमाशा’ सिनेमातील लावणीचं गाणं होतं… तेव्हा ‘काय’ हा शब्द म्हणण्यासाठी त्यांनी मला आग्रह केला… त्यांनी मला ते म्हणायलाच लावलं.. त्यांच्यासोबत उभं राहून म्हणणं म्हणजे… मी आधीच खूप घाबरलेलो तेव्हा मी काय म्हणालो, ते मला आता आठवत देखील नाही…

आमची भेट कधी व्हायची नाही. कारण क्षेत्र वेगळी होती. पण जसा मी त्यांचा जबरदस्त फॅन होतो. आता देखील आहे.. त्याही माझ्या होत्या… ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे… त्यांचा आवाज म्हणजे असा आवज परत होणे नाही… असं म्हणत अभिनेते अशोक सराफ दुःख व्यक्त केलं…

अभिनेते महेश कोठारे यांनी देखील आशा भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला… ‘अशा ताई यांच्या निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झालं आहे… ‘जीवलगा’ सिनेमात त्यांनी प्लेबॅक दिलेला. मी मुद्दाम त्यांच्यासाठी थांबलेलो. कारण मला त्या गाण्यासाठी आशाताईच हव्या होत्या. आता त्यांची खूप आठवण येईल… आशा ताई यांनी यांनी अनेक गाणी गायली आहेत.’

आशीष शेलार यांनी देखील दुःख व्यक्त केलं. ‘आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र दुःखात बुडला आहे… आज एका युगाचा अंत झाला आहे. आपल्या आशाताई आपल्यातून निघून गेल्या आहेत. आपल्या आशा ताई यांचं आसणं हेच आपल्याला समाधान देणारं होतं. दुःखाला स्वतःला कवटाळून दुसऱ्यांना सुख देण्याचा पूर्ण मार्ग म्हणजे त्यांचं आयुष्य होतं. त्यांचं कतृत्व पूर्ण भारताला नाही तर, पूर्ण जगाला वेड लावणार होतं…

आशा ताई यांच्या कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे, आज सर्व मेडीकल प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पारिवारीक विधी पूर्ण होतील. उद्या सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आपण भेटणार आहोत. त्यानंतर 4 वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे… शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भावना व्यक्त केल्या आहे. ‘मंगेशकर कुटुंबातील दुसऱ्या तारा आशा भोसले यांचं निधन झालं आहे. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी संगीताची सेवा केली. गायिका म्हणून जर कोणाकडे पाहायचं असेल तर, त्या आशा ताई होत्या. आशाताईंचं व्यक्तीमत्व जिंदादिल होतं.. आशाताईंची 100 वी करण्याची संधी काळाने दिली नाही… ‘

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट