वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी श्रीदेवीने साकारलेली ‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या आईची भूमिका! वाचा काय होती कथा…

श्रीदेवी आजही बॉलिवूडची एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मानली जाते. बाल कलाकार म्हणून काम सुरू करणार्‍या श्रीदेवीने आपल्या अभिनयाच्या जोरावर नेहमी चाहत्यांना वेड लावले

वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी श्रीदेवीने साकारलेली ‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या आईची भूमिका! वाचा काय होती कथा...
श्रीदेवी आणि रजनीकांत
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 7:43 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) ही  अशी अभिनेत्री होती, जी केवळ तिच्या डोळ्यांनी चाहत्यांना वेड लावायची. श्रीदेवी आजही बॉलिवूडची एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मानली जाते. बाल कलाकार म्हणून काम सुरू करणार्‍या श्रीदेवीने आपल्या अभिनयाच्या जोरावर नेहमी चाहत्यांना वेड लावले. श्रीदेवीचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी झाला होता. त्यांनी जन्माच्या केवळ चार वर्षानंतर म्हणजेच वयाच्या चौथ्या वर्षी अभिनयाच्या जगात प्रवेश केला. या अभिनेत्रीने बालकलाकार म्हणून सन 1967मध्ये ‘कंदन करुणाई’ या तमिळ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटानंतर श्रींनी पुन्हा एकामागून एक सुपरहिट चित्रपटात काम केले (At the age of 13 actress Sridevi plays rajinikanth mothers role in film).

लहानपणापासूनच आपल्या अभिनयाची छाप सोडून गेलेल्या श्रीदेवीने 24 फेब्रुवारी 2018 रोजी या जगाला निरोप दिला, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. श्रीदेवी अशी अभिनेत्री होती जी, कोणत्याही प्रकारच्या भूमिका करण्यास कधीही घाबरत नव्हती. श्रीदेवीने चक्क सुपरस्टार रजनीकांतच्या आईची भूमिका देखील केली होती, हे कोणालाही ठाऊकही नसेल.

‘या’ चित्रपटात साकारलेली रजनीकांतच्या आईची भूमिका

रजनीकांत यांचा 1976 साली ‘मुंदरू मुडीचू’ हा तमिळ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये श्रीदेवीने रजनीकांतच्या सावत्र आईची भूमिका साकारली होती. श्रीदेवीच्या चाहत्यांना जाणून आश्चर्य वाटेल, की जेव्हा श्रीदेवीने ही भूमिका केली तेव्हा ती अवघ्या 13 वर्षाची होती. म्हणजेच या चित्रपटाच्यावेळी श्रीदेवी केवळ 13 वर्षांची होती तर, रजनीकांत 25 वर्षांचे होते (At the age of 13 actress Sridevi plays rajinikanth mothers role in film).

चित्रपटाची कथा काय होती?

चित्रपटात रजनीकांतला श्रीदेवी आवडतात, असे दाखवण्यात आले होते. त्यांना श्रीशी लग्न करायचे असते, पण श्रीदेवीचे रजनीकांतच्या वडिलांशी लग्न झाल्याचा काहीसा ट्विस्ट या चित्रपटात येतो. ज्यानंतर श्रीदेवी या चित्रपटात त्यांची आई बनतात. ‘मुंदरू मुडीचू’च्या रिलीजच्या अगदी 13 वर्षानंतर श्रीदेवी आणि रजनीकांत पुन्हा एकदा पडद्यावर दिसले होते. 1989मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपट ‘चालबाज’मध्ये पुन्हा ते दिसले होते.

श्रीदेवी बॉलिवूडची पहिली ‘लेडी सुपरस्टार’

श्रीदेवीला पहिली ‘लेडी सुपरस्टार’ म्हटले जाते. श्रीने सिनेसृष्टीवर तब्बल 5 दशकांपर्यंत राज्य केले होते. 2013मध्ये त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्यांना भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. श्रीदेवीने 1979 मध्ये ‘सोलावा सावन’ या हिंदी चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. तथापि, त्यांना 1983च्या ‘हिम्मतवाला’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली होती. या चित्रपटात त्यांच्यासोबत जितेंद्र झळकले होते. यानंतर श्रीदेवीने तिच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना मृत्यूनंतर ‘मॉम’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

(At the age of 13 actress Sridevi plays Rajinikanth mothers role in film)

हेही वाचा :

Ram Setu | ‘राम लला’समोर ‘राम सेतु’चा मुहूर्त संपन्न, अक्षय कुमारने शेअर केला खास फोटो!

SSR Drug Case | रिया चक्रवर्तीला कोर्टाचा दिलासा, जामिनाविरोधातील याचिकेवरील पुन्हा सुनावणी होणार!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.